बाबासाहेब
बाबासाहेब
तुम्ही आमच्या हजारोवर्षांच्या
पिढ्यांची गुलामगिरी
एका क्षणात नष्ट करून
नव्या मानसाचा जन्म दिला
आणि
समतेच्या बुद्ध तत्त्वज्ञानची
धम्मदीक्षा दिली …
अथांग ज्ञानाचा युगवीर बनून
विषमतेने बरबटलेल्या
वैदिक विचारावर प्रहार केला ..
मानवमुक्तीचे नवे महायुद्ध लढून
क्रांतीज्वाला आमच्यात पैदा केल्या
काळोखमय असणाऱ्या
आमच्या वाटांणा
प्रकाशाची नवीन ज्योत दिली .
बंदिस्त जातीच्या मजल्याना
संविधान तंत्राने नष्ट केली
काळाच्या ओघात आम्ही
नवी लढाई लढतो आहोत
आमच्यावर पुन्हा
जुने दिवस येऊ नये म्हणून
पण,
बाबासाहेब तुम्ही दिलेले क्रांतीसुत्र
आज अनेक बांधव विसरत आहेत
गुलामी आली असताना
स्वार्थी राजकारणाची
हुजोरी करत आहेत …
बाबासाहेब असं वाटतं
अन्याय प्रवृत्तीचा शिरच्छेद करावा
पण संविधान मूल्यांची
आपली ताकद आम्हाला
तसे परवानगी देत नाही..
बाबासाहेब ,
मला आपल्या भारतीय
माणसावर पूर्ण विश्वास आहे
तोच खऱ्या क्रांतीचे
बिगुल फुकणार आहे..
धम्मचेतना मनी रुजवून
क्रांतीच्या सूर्योदय उजाळणार आहे.
भारतीय संविधानसूर्य
सदोदित तेजाळत राहणार आहे …
-संदीप गायकवाड, नागपूर
९६३७३५७४००