आयुषीचं वाढदिवसी रक्तदान रासेयोचं आयोजन
गौरव प्रकाशन
कुऱ्हा/नितीन पवार
श्रीक्षेत्र पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.आयुषी रंजीत भिल्लम हिने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या वाढदिवशी रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला आहे.
श्री संत शंकर महाराज यांचे प्रगटदिनाचे औचित्य साधून श्री संत शंकर महाराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात आयुषी रणजित भिल्लम सह अमित उईके, अनिकेत पाटील,सचीन देशमुख, सत्यजित देशमुख, उदय गावटे,साईनाथ कुटे,ओंकार मेश्राम, अनमोल जगताप, कुणाल गिरड, सुभाष मुरे, किशोर उकेटोहने या रक्तदात्यांनी रक्तदान केले.त्यात आयुषीचा समावेश आहे.विशेष म्हणजे जे मुलं मुली रक्तदानासाठी धाडस करीत नव्हते त्यावेळी आयुषीनं धाडस करीत स्वतःचा वाढदिवस रक्तदानाने साजरा करून विद्यार्थी व समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.आयुषीचे उपस्थित मान्यवरानी कौतुक करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.रक्तदान हे जीवनदान आहे त्यासाठी मनात कुठली भीती न बाळगता आजच्या युवक युवतीनी रक्तदानासाठी पुढे यावं आणि इतरांनाही प्रेरित करावं असं आयुषी भिल्लम हिने आव्हान केले आहे. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त श्री देवेंद्रजी वाल्हेकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक राजुभाऊ भोगे, प्राचार्य डॉ. सुभाष मुरे प्राचार्य डॉ. सी यु पाटील बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्त संकलन जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे रक्त संकलन अधिकारी आशिष वाघमारे जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे यांच्या नेतृत्वाखालीलं चमू संगीता गायधनी, ज्ञानेश्वरी बोबडे, प्रवीण कळसर मंगेश उमप यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे यांनी केले.
कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश इंगळे, प्रा दीपक बोन्द्रे यांचे सह प्रा पवन शिवरकर,सुहास आपतूरकर ,संतोष नागपुरे, प्रा.विजय कामडी,प्रा.कु बीजने कु.वैष्णवी बुराडे, कु.वैष्णवी गावंडे यांचे सह सर्व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.