पोलिस अधिक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे पोलिस विभागाकडून कौतूक
गौरव प्रकाशन
अमरावती(प्रतिनिधी) : नागरी हक्क संरक्षक अमरावती परिक्षेत्रातील पोलिस अधिक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी ‘दक्षिण सीमावर्ती गडचिरोली भागात मराठी भाषेवर तेलुगुचा पडलेला सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव’ या विषयावर पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी भाषेवर तेलुगु भाषीकाचा झालेला प्रभावाबाबत विस्तृत लेखन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पायगुण पब्लीकेशन, अमरावती यांचे कडे करण्यात आले आहे.
श्री. राठोड यांनी उत्कृष्ठ लेखन केले असून त्यांच्या लेखनाचे नागरी हक्क संरक्षण मुंबई अपर महासंचालक कैसर खालीद, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे व अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण अविनाश बारगळ व अपर अधिक्षक शशिकांत सातव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.