राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी अर्ज करा
शासनमान्य ग्रंथालयांना आवाहन
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी व असमान निधी योजनेत ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले आहे.
समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध नमुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन 2023-24 साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथलयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून उपलब्ध डाऊनलोड करून घ्यावा.