गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, अमरावतीमार्फत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी महामंडळाच्या कर्ज योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 200 दिव्यांग व्यक्तींना कर्ज मागणी अर्ज उपलब्ध आहेत.
पात्र लाभार्थ्यांसाठी महामंडळाच्या दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजनेंतर्गत 100 तसेच वैयक्तिक थेट कर्ज योजनेमध्ये 100 असे एकूण 200 अर्ज उपलब्ध आहेत. इच्छुक पात्र व्यक्तींनी कर्ज मागणीसंदर्भात महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदुररेल्वे रोड, पोलीस आयुक्त कार्यालया मागे, अमरावती येथे संपर्क साधून कर्ज मागणी अर्ज प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.