अमरावती: जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 10 वी, 12 वी, पदवी गुणवंत व गरजु विद्यार्थ्यांना असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्पॉईज इंडीया या संस्थेमार्फत एकूण 16 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब व रू.6000/- शिष्यवृत्ती देण्यात आली.
APEI संस्थेचे कार्य विद्यार्थ्यांकरीता एकूण 22 जिल्ह्यात सुरु असुन संस्थेमध्ये उच्च शिक्षीत सदस्य आहेत. विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या गुणवत्ता व परिस्थितीनुसार करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना आई आहे तर वडील नाही, काही अनाथ आहेत, काही विद्यार्थ्यांचे पालक हे हातमजुरी, फेरीवाले असा व्यवसाय करून आपल्या मुलांना पुर्णपणे शिक्षण देऊ शकत नाही. अशा गरजु विद्यार्थ्यांना संस्थेच्या सभासदांनी शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा वसा घेतलेला आहे.
विद्यार्थ्यांनी पुढे उच्च शिक्षीत व्हावे व तांत्रिक शिक्षण घ्यावे त्यासाठी संस्थेतील सर्व सभासद भविष्यातही मदत करण्यास तयार आहे.
शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजक पराग वानखडे, मुख्याधिकारी, नगर परिषद चांदूर बाजार, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल भटकर, (उपजिल्हाधिकारी), प्रा.विलास तेलगोटे, डॉ.अबरार (दंत चिकित्सक), शोएब खान (प्राचार्य), शितल सहारे (GPS तंत्रज्ञ), प्रा.भावना वानखडे, सुरेश चिमनकर, यशपाल वरठे, डॉ.भावना वानखडे, नरेंद्र गवई, हेमंत गावंडे, राजेश शंके, पृथ्वीराज, संजय वाळसे, विशाल शिंदे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी प्रा.विलास तेलगोटे यांनी अपयशाने खचुन जाऊ नका असे मत व्यक्त केले. तसेच डॉ.अबरार यांनी गरीबी अभ्यासात अडथळा होऊ शकत नाही असे मत व्यक्त केले. प्रा.शोएब सर यांनी APEI चे कार्य प्रेरणादायी आहे, शिक्षणासाठी कोठेही जायचे असेल तर जरूर जा… असे मत व्यक्त केले.
सदरचा कार्यक्रम हा पटवारी भवन, जोगळेकर प्लॉट, रूख्मीनी नगर, अमरावती येथे दिनांक 08/11/2020 रोजी सकाळी 11.30 वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन राजु पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश चिमनकर यांनी केले.
Contents
hide