अण्णाभाऊंची लेखणी
Contents
hide
अण्णाभाऊंची लेखणी
आहे विश्वात देखणी..
फकिरा लढाऊ स्वाभिमानी
अशी ही झुंजार लेखणी..
अण्णाभाऊ होते स्वाभिमानी
मराठी अस्मिता ठेवूनी मनी
शिवरायांचा पोवाडा नि गाणी
रचली संयुक्त महाराष्ट्राची लावणी
जग बदल घालूनी घाव
सांगूनी गेले मज भिमराव
अण्णाभाऊंचं रशियात नाव
धन्य त्यांचे पिता भाऊराव
कल्पनेची मारली कधी ना भरारी
वारणेचा वाघ ,माकडीचा माळ
आवडी ,चिञा,बरबाद्या कंजारी
साहित्यातली माणसं खरीखुरी
पृथ्वी नाही नागाच्या डोक्यावरी
तरली ती कामगाराच्या हातावरी
अण्णाभाऊ साहित्याच्या दरबारी
खरे भारतरत्नाचे मानकरी..
नवा संकल्प करू शुभ दिनी
अण्णाभाऊंना वंदन करूनी
आहे विश्वात देखणी..
अण्णाभाऊंची लेखणी ..
अजय बनसोडे
दापेगाव ता.औसा जि.लातूर
मो.(8408042349)
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा…!