अमृत धारा
Contents
hide
आला पाऊस पाऊस
जशा अमृताच्या धारा
रान भिजल भिजल
तृप्त झाली वसुंधरा !!
कशी तुडुंब तुडुंब
नदी काठोकाठ वाहे
कसा खुशीत खुशीत
टाहो बापूयाचा राहे !!
घाव बुजले बुजले
काळ्या मातीचे मातेचे
रान फुलले फुलले
रंग बेरंगी फुलांचे !!
झाला आनंद आनंद
बळीराजा सुखावला
खोंड उंडारे उंडारे
सर्वा निसर्ग पावला !!
जल अमृत अमृत
कशी निसर्गाची माया
झाली हिरवी हिरवी
काळ्या मातीची रे काया !!
असा पाऊस पाऊस
कसा जगोते जीवाले
टरारले कोंब कोंब
जीव फुटला मातीले !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
अकोला 9923488556