‘वेदनेचे काटे’ कवितासंग्रहावर ऐसपैस गप्पा
गौरव प्रकाशन
नाशिक (प्रतिनिधी) :शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर, २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू ऐसपैस काही…’ या सदरात कवी/ गीतकार सोमनाथ पगार हे त्यांच्या ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पा मारणार आहे. ही एक साहित्यिक कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी प्रा. ऐश्वर्य पाटेकर यांची प्रस्तावना तर ज्येष्ठ लेखिका प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांची ‘पाठराखण’ लाभली आहे.
या कार्यक्रमात दोन भाग्यवान विजेत्यांना ग्रंथ भेट देण्यात येणार असून वाचक, रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्टान तथा पुस्तकावर बोलू काही या उपक्रमाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष कवी रवींद्र मालुंजकर, समन्वयक कवी संजय आहेर, संचालक कवी व पत्रकार ब्रिजकुमार परिहार, कवी सोमनाथ साखरे, ज्येष्ठ लेखक मिलिंद चिंधडे, कवी राजेश्वर शेळके, ज्येष्ठ लेखक अर्जुन वेलजाळी, लेखक योगाचार्य अशोक पाटील, कवी मधुकर गिरी, कवयित्री वैजयंती सिन्नरकर, लेखिका अलका दराडे, कवयित्री सुनंदा पाटील आदी मान्यवरांनी केले आहे.