पारनेरचा एक राजकीय दुष्काळ मिटला;
अजून एक स्वप्न बाकी!
पारनेर म्हटलं की डोळ्या समोर येतो दुष्काळ. इथला भूभाग आणि इथली भौगोलिक स्थितीच अशी आहे . कमी पाऊस पडत असल्या मुळे सतत दुष्काळ. त्यात 85% पेक्ष्या जास्त शेती ही पावसावर अवलंबून आहे. आता तुम्हीच विचार करा.,जिथे बागायती शेतकरी हवालदिल आहे,तिथे कोरडवाहू शेतकऱ्यांची व्यथा काय लिहावी ते तुम्हीच सांगा. कायम दुष्काळ मग तो शेतीचा असो अथवा राजकीय दुष्काळ . पारनेर च्या वाट्याला आलेला.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर कधीच राज्याच्या राजकारणाचा केंद्र बिंदू नसणारा व राज्य पातळीवर दखल घ्यावं अस नेतृत्व जाणूनबुजून तालुक्यातुन निर्माण होऊ दिल गेलं नाही.ही खूप मोठी शोकांतिका होती. ती सल सतत पारनेरकर जनतेच्या मनात बोचत होती.
कोपरगाव मतदारसंघात असताना कधी कै.बाळासाहेब विखे तर कधी शंकरराव काळे आणि थोडं कोल्हे घराण्याच वर्चस्व ह्या मतदारसंघात राहील .नगर दक्षिणला जोडल्या नंतर ही काही विशेष पारनेरच्या वाट्याला आलं नाही.तसच इतिहासात डोकवल तर राज्याच्या राजकारणात ही आजवर पारनेरच्या भूमीपुत्राला कधी ही मंत्री पद वाट्याला आलं नाही आणि खासदारकी ही मिळाली नाही.सतत दुष्काळ आणि त्यात हा राजकीय दुष्काळ ही पारनेर च्या वाट्याला येत राहिला.
परंतु मागील विधानसभेला प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आणि सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा असणारे. निलेश लकें हे तीन टर्म आमदार असणाऱ्या मातब्बर विजय औटी यांना चित करत आमदार झाले. कधी नव्हे तो राज्याच्या राजकीय राजकारणाचा झोत हळू हळू पारनेर वर फिरू लागला. मीडिया ही महत्व देऊ लागला.(समाज सेवक अण्णा हजारे अपवाद परंतु ते राजकिय व्यक्तिमत्त्व नव्हतं) आपल्या कामाची छाप आणि सर्वसाधारण प्रतिमा ग्रामीण बोली. कार्यकर्त्यांच प्रचंड मोठ जाळ आणि पायाला भिंगरी लावून फिरण्याचा फायदा तर झालाच परंतु थेट पवार साहेब व अजित दादा यांच्याशी जवळीक असल्या मुळे खूप मोठा निधी तालुक्यात आला.
कोविड काळातील कामा मूळे,लकें यांची प्रतिमा राज्य भर पोहचली.त्यामुळे हा तरुण आमदार जणू राष्ट्रवादीचा ग्रामीण चेहरा बनला, आणि हाच मोहरा कधी विखे सारख्या मातब्बर घराण्याच्या राजपुत्राला पराभूत करून पारनेरचा एक राजकीय दुष्काळ कमी करेल अस म्हटलं तर लोक हसले असते परंतु ह्या तरुणाने जिद्द, प्रचंड लोकजोडण्याची कला.आणि दूर्दम्य इच्छा शक्ती ह्या बळावर खासदार म्हणून निवडून येऊन. स्वतंत्र प्राप्ती नंतर पहिल्यांदा पारनेरचा भूमिपुत्र खासदार म्हणून संसदेची पायरी चढणारा लोकनेता ठरला.शरद पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत हा तरुण खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरला.
त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा. एक राजकीय स्वप्न सत्यात उतरल अजून एक बाकी…!
– अशोक पवार
गटेवाडी पारनेर नगर
8369117148