मोर्शी वरूड उपजिल्हा रुग्णालयात निर्माण होणार नवीन ट्रॉमा केअर युनिट
मोर्शी वरूड तालुक्यात निर्माण होणार भक्कम आरोग्य सुविधा – आमदार देवेंद्र भुयार
विवीध ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन !
वरूड (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी वरूड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्य यंत्रणा प्राधान्याने निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील वरुड,मोर्शी तालुक्यातील जनतेसाठी नवीन रुग्णालय करण्यासाठी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड येथे १०० बेड महिला व बाल रुग्णालय, वरूड येथील ५० बेड उपजिल्हा रुग्णालयाचे १०० बेड मध्ये श्रेणीवर्धन करने.
जरूड येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र. लोणी येथे ५० बेड चे ग्रामीण रुग्णालय. मोर्शी येथे १०० बेड चे ट्रामा केयर. खेड येथे ३० बेड चे ग्रामीण रुग्णालय, रिद्धपुर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळखुंटा मोठा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र वरुड उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य कर्मचारी निवासस्थान मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य कर्मचारी निवासस्थान बांधकाम कारणे यासह आदी विकासकामे मंजूर करून आणली.