श्रद्धा जिवंत ठेवा
घालवा काही क्षण कुटुंबातील वृद्धा सोबत
कारण एक दिवस ते कायमचे सोडून जातील
राहतील शिल्लक त्या आठवणी अन् ते क्षण….
खर्च करा त्यांच्यावर हिशेब न ठेवता
कारण एक दिवस ते सर्व आपल्या साठी सोडून जातील हिशेब न सांगता….
राहतील शिल्लक त्या आठवणी अन् ते क्षण
नका टोकु त्यांना बोलू द्या कितीही
अनुभवाचे बोल एक दिवस निशब्द होतील…..
राहतील शिल्लक त्या आठवणी अन् ते क्षण
घ्या आशिर्वाद थरथरते हात डोक्यावर ठेऊनी
नंतर ते हात जोडून फोटोमध्ये दिसतील…….
राहतील शिल्लक त्या आठवणी अन् ते क्षण
खाऊ घाला प्रेमाने त्यांच्या आवडीचे सर्व
नंतर ते कधीच पाहनार नाही तुमचे श्राद्धाचे पर्व
आठवतील फक्त ते क्षण अन् त्या आठवणी…….
– सुनिल ढोकणे