आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना
* बाप्पांची आराधना व आदरातिथ्यात खोडके परिवार तल्लीन
*विश्वकल्याणाची मनोकामना करीत शहरावासीयांना दिल्या श्री. गणेशोत्सव २०२४ च्या शुभेच्छा
गौरव प्रकाशन
Marathi News अमरावती (प्रतिनिधी) : सिद्धी-सिद्धीचे दैवत, मांगल्याचे प्रतीक श्री. गणरायाचे आज दिनांक ०७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर मोठ्या धुमधडाक्यात आगमन झाले. शहरातील लहान-मोठ्या गणेश मंडळात तसेच भक्तांच्या निवासस्थानी विघ्नहर्ता भगवान श्री. गणेशाची स्थापना करण्यात आली.
हे वाचा : घरीच बनवा, घरीच विसर्जन करा.!
अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या गाडगे नगर स्थित निवासस्थानी श्री. गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली. बाप्पाच्या आराधनेत खोडके परिवार तल्लीन झाले असून बाप्पांच्या स्वागत व आदरातिथ्यासाठी आकर्षक अशी आरास सजविण्यात आली आहे. यावेळी आमदार महोदयांसमवेत कुटुंबीयांनी श्री. गणरायाची आरती ओवाळून व पूजन करून कृपाशिर्वाद घेतले. यावेळी श्री. यश खोडके व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अमरावती शहरातील समस्त नागरिकांना सुख, समाधान व समृद्धी लाभो, सर्वांना भरभराटी, मांगल्य व चांगले आरोग्य लाभो, अशी मनोकामना करीत आमदार महोदयांनी सर्व शहरवासियांना श्री. गणेशोत्सव २०२४ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.