कुऱ्हा येथे पदवीदान समारंभ संपन्न
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक सलग्नित भगवानराव प्रशासकीय महाविद्यालय कुऱ्हा येथे प्रथम पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
उद्घाटन कमल विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सिकंदर मनवरे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक बोर्ड ऑफ स्टडीचे मेंबर डॉ. संजय खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून केशरबाई शिक्षण शास्त्र महाविद्यालय अचलपूरचे प्राचार्य मंगेश शेंडे,नानीबाई शिक्षण शास्त्र महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉ.सुरेश गाडे, श्री संत शंकर महाराज कला वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटाचे डॉ.नरेश इंगळे रामटेक विद्यापीठ बोर्ड ऑफ स्टडीचे मेंबर डॉ.अनिल नागदेवते प्राचार्य शरद गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवराच्या शुभहस्ते पदवी प्रदान करण्यात आली.या अंतर्गत एकूण १६५ पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यात आले.ग्रामीण भागात महाविद्यालयाचे योगदान आणि उत्तरोत्तर महाविद्यालयाची होणारी भरभराटी बद्दल तसेच पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.
पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.सूत्रसंचालन प्रा.शंतनू आसोडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.पाखरे यांनी मानलेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. अंकुश अंभोरे,प्रा.अमर केने संदेश कठाने, कु.दीक्षा धवने सागर दुधे,संकेत मनवरे आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.