शिकण्या सारख..!
खर तर मैत्री म्हंटल की त्याला जात धर्म, प्रांत ह्या गोष्टी सहजासहजी आडव्या येत नाहीत.कारण ते नातच निर्मळ झऱ्या सारख आहे. वेगवेगळ्या जाती धर्मातील मित्र जेव्हा भागीदारीतून एखादा व्यवसाय सुरू करतात त्या वेळी येणारा अनुभव वेगळा असतो….त्यातील हा एक…..
राजेश आणि हिमेश दोघे एकदम पक्के मित्र आता हिमेश हा गुजराती कुटूंबातूंन असल्या मुळे घरची परिस्थिती चांगली होतीच त्याच बरोबर मोठा व्यवसाय ही होता. त्याचा मित्र राजेश मात्र नोकरदार कुटुंबातील असल्या मुळे आता त्याच्या समोर नोकरी, करायची की व्यवसाय हा प्रश्न होता. हितेश ने त्याला सल्ला नोकरी करण्या पेक्ष्या आपण भागीदारीत व्यवसाय करू. हिस्सेदारी कशी काय असेल ते सगळं ठरलं.ते ही कागदोपत्री.
मोठं कपड्याच् दुकान त्यांनी सुरू केलं. उदघाटन ज्या दिवशी होत त्या दिवशी हितेश व राजेश ,दोघांच्या घरची मंडळी पाहुणे ,मित्र परिवार मोठ्या संख्येने उदघाटन समारंभाला आला होता. हितेश कडील मंडळी जोरदार खरेदी करत होती.
तर राजेश कडील मात्र शाल आणि पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन शुभेच्छा देऊन निघून जात होती.
हितेश कडील मंडळी मोठी खरेदी करत असल्याचं पाहून राजेश ने विचारलं यार हितेश तुमची मंडळी इतकी भरभरून खरेदी का करतायत रे! ह्यावर हितेश हसला . आणि बोलू लागला. हे बघ राजेश नवीन व्यवसाय लगेच चालतो अस नाही. त्या मूळ आमची मंडळी उदघाटन प्रसंगी खरेदी करून अप्रत्यक्ष भांडवल उपलब्ध करून देत असतात. ज्या मूळे रोखी ची किमान एकदोन महिने अडचण होऊ नये म्हणून…..
राजेश च्या मनात आता प्रकाश पडला उगाच एखादा समाज प्रगती करत नाही.हे त्याला समजून चुकलं होत,तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही ही त्या समाजाच अनुकरण करून आपला समाज मोठा करू शकता.
अशोक पवार
गटेवाडी ,पारनेर नगर
8369117148