अंजनाबाई शहादू वाघ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
गौरव प्रकाशन
येवला (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक अंजनाबाई शहादू वाघ यांना कै. सौ. नलिनी प्रभाकर सूर्यवंशी, उपसंपादिका, साप्ताहिक अभिनव खान्देश. धुळे यांच्या स्मरणार्थ अभिनव खान्देशकडून राज्यभरातील नऊ कर्तृत्ववान महिलांना दिल्या जाणाऱ्या अभिनव खान्देश राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी धुळे येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, आणि पुस्तके देवून धुळे महानगर पालिका आयुक्त मा श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक, तथा देशसेवेत जेसीओ पदावर कार्यरत असलेल्या राजेश वाघ,कवी प्रशांत वाघ व संजय वाघ यांच्या मातोश्री अंजनाबाई शहादू वाघ यांना कै. सौ. नलिनी प्रभाकर सूर्यवंशी, उपसंपादिका साप्ताहिक अभिनव खान्देश. धुळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा अभिनव खान्देश राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी साप्ताहिक अभिनव खान्देशकडून राज्यभरातील मा मोनिका शिंपी – धुळे, मा मनिषा गायकवाड- राहुरी, डॉ. पल्लवी परुळेकर बनसोडे-मुंबई, मा डॉ संगीता नांदुरकर धुळे, मा. जया नेरे- नवापूर, प्रा. राजश्री चव्हाण- धुळे , डॉ शुभम राजेश पाटील- धुळे अशा एकूण नऊ कर्तृत्ववान महिलांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात अंजनाबाई शहादू वाघ यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
या प्रसंगी केंद्रीय अध्यक्ष, खान्देश साहित्य संघ, धुळेचे मा डॉ प्रा. सदाशिवराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला निवृत्त न्यायाधीश तथा शिवतीर्थ जेष्ठ नागरिक संघाचे मा ऍड जे.टी.देसले, यवतमाळचे निवृत्त न्यायाधीश मा विलासराव घोडचर, सिद्धेश्वर हॉस्पिटल धुळेचे मुख्य संचालक मा. जितेंद्र ठाकूर, जेष्ठ पत्रकार मा भालचंद्र ठाकूर, निसर्ग मित्र समिती धुळेचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, उद्योजक मा के.एम बाफना, अंधश्रद्धा निर्मुलन समिती धुळेचे राजाध्यक्ष मा अविनाश पाटील, अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाध्यक्ष मा रमेशआप्पा बोरसे, जि.प. धुळे मुख्य कार्यकारी अभियंता मा मुकेश भालचंद्र ठाकूर, धुळ्याचे निवृत्त नायब तहसीलदार मा सोमनाथ बागुल, धुळ्याचे निवृत्त विमा अधिकारी मा दिलीप वाघ, नाशिकच्या कवयित्री मा सविता दरेकर, आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर मालेगाव येथून सुशिला गरुड, दादाजी अहिरे, अशोक आहिरे, शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान येवला अध्यक्ष संजय वाघ, इंदुताई गायकवाड,भगवान शिंदे,प्रमोद अहिरे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुंबईच्या कवयित्री श्रीमती कल्पना देशमुख यांनी केले तर महेश सूर्यवंशी यांनी आभार मानले . संपादक प्रभाकर सूर्यवंशी, सौ. कविता सूर्यवंशी, ऍड. सौ. भावना ठाकूर, सौ दिपाली गायकवाड आणि अभिनव खान्देशचे संपादकीय मंडळ यांनी शिवतीर्थ नागरिक संघ कार्यालय धुळे येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.