ऑलिंपिक : भारत नेमका कुठे ?
आगदी पुरातणकालापासून माणुस स्वतःची करमणुक करण्यासाठी विधिव मार्ग विविध योजना शोधत आलेला आहे.तो कोंबडे झुंजवतो.प्राण्याच्या शर्यती लावतो. तो तमाशा करतो.तमाशाला जातो.आजही तो करमणुकीचे नवनवीन वाटा शोधत असतो.यातून तो दुसऱ्यापेक्षा वरचढ कसा आहे यासाठी धडपड करत असतो.सर्वच जीवंत प्राण्यांमध्ये एक इर्षा दिसून येते ती म्हणजे “मी इतरांपेक्षा श्रेष्ट आहे हे दाखण्याची व वरचढ ठरण्याची.” त्यासाठीच त्याने विविध खेळांचा शोध लावला.माणसाविरुद्ध माणसं झुंजवली. आजही झुंजवतात व पुढे झुंजवत राहणार आहेत. सत्ताधारी श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी युद्ध घडविले व सध्या युध्द होत आहेत.मानव प्राण्याव्यतिरिक्त इतर प्राणीही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी झुंजत असतात हे आपण पहातोत.होय आगदी बालपासून वरचढपणांची होड यांच्यात दिसून येते.ही चढाओढ केवळ व्यक्ती व्यक्तीतच दिसून येत नाही तर वेगवेगळ्या समुहात, गटात, जातीत, देशादेशात दिसून येते.पुढे आशा वृत्तीतूनच ऑलॉम्पिकसारख्या स्पर्धांचा जन्म झाला.यातून सामान्य माणसांची करमणूक झाली.विविध कला,खेळ,कौशल्य,शक्ती दाखविण्याची संधी योग्य व्यक्तीनां मिळाली. याव्दारे पूर्वीच्या राजांना वर्चस्व गाजविण्याची संधी मिळाली.अधुनिक युगात तेच काम जगातील २०६ देशांचे राजकर्ते करताना दिसत आहेत.यातही दुर्बल तळालाच आहेत तर सबल देशात स्पर्धा रंगताना दिसत आहे.
नुकत्याच संपलेल्या ऑलॉम्पिक स्पर्धेत आपण नेमके कुठं आहोत?आपली आजची स्पर्धा ही आपल्या शेजारी देशाबरोबर दिसून येतो. आपण चीन व पाकिस्तान या देशांना प्रत्येक बाबतीत धोबीपच्छाड देण्याची भाषा करत असतोत.पण,सध्यातरी खेळाच्या बाबतीत आपण चीनची बरोबरी काय पण त्याच्या जवळपास ही नाही. त्या देशाची फ्रान्समधील पदकांची संख्या पाहिली तर आपण आतापर्यंत कमावलेल्या पदकापेक्षा दुप्पटीपेक्षा जास्त भरते.आपण त्यांच्यापासून हजारो मैल दूर आहोत.बघा काय फरक आहे ते.अमेरिका या देशाने चाळीस गोल्ड,चौरे चाळीस रौप्य तर बेचाळीस कास्य असे एकून एकशे सवीस पदकं जिंकलेले आहेत तर ज्याच्याशी आपण स्पर्धा करतोत,आपला शेजारी चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.चीनची कमाई आहे चाळीस गोल्ड,सत्ताविस रौप्य व चोविस कास्य असे एकून एक्यानो पदकाची कमाई केलेली आहे.त्यानंतर कदाचीत महाराष्ट्र एवढया अकाराचा असलेला जपान तिसऱ्या क्रमांकार आहे.या देशाची एकून पदकांची कमाई आहे पंचेचाळीस.केला का विचार ?
भारत पारतंत्र्यात असल्यापासुन या स्पर्धामध्ये भाग घेत आलेला आहे.आतापर्यंत ३३ वेळा ही स्पर्धा झालेली आहे.या तेहतीस स्पर्धेत आतापर्यंत भारताची पदकाची कमाई आहे :१० स्वर्ण,१० रौप्य व २१ कास्य असे एकून ४१ पदकांची कमाई भारताने केलेली आहे.यात हॉकी या खेळात ८स्वर्ण,१ रौप्य व ४ कास्य पदकांचा समावेश आहे.मग आतापर्यंत वैयक्तिक पदकांची संख्या पहा करत बसा हिशेब.
फ्रान्स या देशांतही स्पर्धा इस १९००, १९२४मध्ये झाली. व त्यानंतर शंभर वर्षांनी म्हणजे २०२४ ला भरविण्याचा मान फ्रान्सला पुन्हा मिळालेला आहे.ही स्पर्धा म्हणजे गतीमान, उच्चतम व शक्तिमान या मुल्यांना वाहिलेली आहे.या स्पर्धेत एकूण २०६ देशाच्या खेळांडूनी भाग घेतला.खेळाडूची संख्या १०७१४.इतक्या खेळांडूनी ही स्पर्धा गाजविली . या स्पर्धेवर ९ अब्ज डॉलर खर्च झालेला आहे. ही स्पर्धा म्हणजे वासुदेव कुटूबंमः,जय जगत या भारताच्या कल्पनाना मूर्त स्वरुप देणारी स्पर्धा आहे.मानवजात एकच आहे ही पटवून देणारी स्पर्धा आहे.आज या घडीला तरी धर्म, लिंग, वंश, वर्णभेद, जातपात या सर्वांना सामाऊन घेणारी आहे.भारतीयासाठी अभिमानाची एकच गोष्ट आहे की, भारताने या ऑलॉम्पिकमध्ये आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची पदक कमाई केलेली आहे.यापूर्वी आपण सात पदकांची कमाई केलेली होती यात आपण सहा पदकं कमावलो आहोत.यात वैयक्तिक पाच पदक आहेत तर हॉकीत एक आहे. पाच कास्य व एक रौप्य आहे. वैयक्तिक पाच कास्य पदकांच्या कमाईत मन्नू भाकर दोन पदक पैकी एक मिश्रमध्ये आहे आणि ही तिची ऐतिहासिक व विक्रमी कमाई आहे.त्यानंतर स्वप्नील कुसाळे, सरबतज्योतसिंग व अमन शेहरावत यांचा समावेश आहे.कुस्तीपटू खाशाबा जाधवनंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राच्या एका तरुणाने कास्य पदक जिंकलेले आहे तो विर आहे स्वप्नील कुसाळे.मागच्या ऑलॉाम्पिकचा गोल्डन बॉय निरज चोप्रा यावेळी सिल्व्हर बॉय झाला.आपण सर्व जगाला दिंडोरा पिटून सांगत आहोत आर्थिक दृष्टया पहिल्या पाचमध्ये आहोत नव्हे आता आम्ही तिन नंबरला येणार ;पण खेळात पाहिलोत तर दोनशे सहा देशात आपण नेमके कुठं आहोत?भाग घेतलेल्या देशापैकी एकून ९४ देशांनी पदकं कमावलेली आहेत.या ९४ देशात आपला क्रमांक आहे ७१ वा.भारतीय क्रिडा प्राधिकरणाने रु ४७० कोटी खर्च केलेला आहे.त्याचं फलीत म्हणून पाच कास्य पदकं व एक रौप्य पदक आपणास मिळालेल आहे.
भारताने एकून १६ क्रिडा प्रकारात ११७ खेळाडूनी सहभाग नोंदविला.यात भाग घेतलेल्या खेळांडूवर ४७० कोटी रु खर्च झाला.कंसात या खेळावर झालेला खर्च आहे कोटीत.आश्वरोहन(०.९५)टेनिस(१.६७)गोल्फ नौकायन(३.७८)रोविंग(३.८९ )जलतरण(३.९ ) ज्युडो(६.३३)टेबल टेनिस(१२.९२) भारातोलन( २७ )कुस्ती(३७.८)तिरंदाजी (३९.१८) हॉकी (४१.३) नेमबाजी (६०.४२) मुष्टियुद्ध(६०.९३) बॅडमिंटन(७२.०३) अथलेटिक्स (९६.०८)यवढं खर्च करून याचं फलीत काय ?तर फक्त सहा पदकांची कमाई आपण करू शकलो मग आपण नेमकं कुठे कमी पडलो ? कुठं मागे पडलोत?का पडलोत?असं होण्यास कारणीभूत कोण ?याचा मागोवा आपण कधीच घेत नाही.थातूरमासूर काहीतरी करायचं व कानाडोळा करायचाही आपली सवय झालेली आहे. बेगडी चौकशी करून मोकळे होतात.
यात दोन घटना अतिशय मन हेलावणाऱ्या घडल्या एक अंशू मालिक या कुस्तीपटूची.ती जिंकण्याच्या राजमार्गावर होती. विजय तिचाच होता.पण,शेवटच्या टप्प्यात ती दुखापतग्रस्त झाली याचा फायदा प्रतिस्पर्धाने घेतला व ती हरली.ती असहय वेदनांनी रडली. भारतीयांच्या डोळ्यात पाणी आलं.तर दुसरी घटना सुवर्णक्षणाच्या जवळ पोहचलेली चपळ वाघीन सेमीफायनलमध्ये हरता हरता जिंकली. शेवटच्या आठ सेंकदात या आक्रमक खेळाडूनी वाघीनीचं रुप धारण करुन प्रतिस्पर्धी खेळाडूला अस्मान दाखवून फायनलमध्ये प्रवेश केली.पण, शंभर ग्राम वजणाने तिचा घात केला.अधिकचं वजण म्हणून तिची सुवर्णसंधी तिनं गमाविली. आई मला माफ कर म्हणून तिने अश्रुला वाट मोकळी करून दिली.या दोघीनी पदक जिंकलं नाही ;पण भारतीयांची मनं जिंकली.
आपण नेहमीच मागे का?आपण खर्च भरपूर करतोत?मग नेमकं घडतयं काय?आपले कोच अंतरराष्ट्रीय दर्जाचे नसतात का?दिलेल्या पैशाला अनेक वाटा फुटतात का?योग्य लायक खेळाडूची निवड केली जाते का?प्रशिक्षणासाठी मैदान,साहित्य किंवाभौतिक सुधिवा पुरवत नाहीत का?असे कितीतरी प्रश्न भारतीयांच्या मनात वादळासारखी घोंगावत राहतात.याचं उत्तर कोणीही देत नाहीत.शोधत नाहीत.गेंड्याची कातडी पांघरून येथे फक्त वाघाची डरकाळी फोडण्याचा आव आणतात.सत्ताधाऱ्यांनी जर मनात आणलं तर तर भारत खेळातही महाशक्ती म्हणुन उदयास येवू शकते पण त्यासाठी इच्छाशक्ती लागते.
खरं तर भारतात पुरातण काळापासून ऑलॉम्पिकमधले खेळ खेळेलले दिसतात.भीम, अर्जुन,हनुमान व एकलव्य या सारखे तरबेज खेळाडू आपणास तयार करावे लागेल.खेळ कोणताही असो येथे तोंडपाहून खेळाडू निवडले जातात. मैदांनीस्पर्धसाठी भारतातील वनवासी जमातीतील,गरीब जातीतील योग्य मुलांमुलीना निवडून जर योग्य प्रशिक्षण दिलं तर ते देशाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाहीत.
आता फ्रान्स पॅरीस येथील स्पर्धा संपली.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फ्रान्स सरकारने ४५ हजार स्वयंसेवक दिलेले होते शानदार स्पर्धेचे शानदार समारोप करण्यात आला.आयओसीचे प्रमुख थॉमस बॉक यांनी ऑलॉम्पिकचं ध्वज उत्तरुन पॅरिसच्या महापौर यांच्या स्वाधिन केलं त्यांनी ते पुढील यजमान लॉस एंजिल्सच्या महापौराकडे सुपूर्द केलं.भारतीयांनी कामगीरी कशीही केली तरी ते भारतीय आहेत.त्यांचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.पाहू या घोडा मैदान जवळच आहे. आपण आशा करू या येणारा काळ निश्चितच भारताचा असेल.भारतीय खेळाडूचा असेल.
राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७ .