“एक आगळा वेगळा अमृत महोत्सव सोहळा”
प्रेमाचा अथांग सागर म्हणजेच मराठा विद्या प्रसारक संस्थेतील सिन्नर येथील जी. एम . डी. कॉलेजचे माजी प्राचार्य आर. डी. पवार सर, लेखक वि.स. खांडेकर यांनी लिहिलेले आहे करूनेचे रूपांतर कृतीत केले पाहिजे, नुसती करुणा दाखवून उपयोग नाही तर जेव्हा त्या करुनेचे रूपांतर खऱ्या अर्थाने कृतीत होते तेव्हाच त्या करूनेला अर्थ असतो, याच करूनेचे रूपांतर कृतीत करणारे सर म्हणजे आर डी पवार सर, कॉलेज जीवनात माझे शिक्षण घेताना प्रवेश मूल्य भरायला पैसे नव्हते तर त्यांनी ते तीनही वर्षाचे प्रवेश मूल्य माफ केले होते त्यामुळे माझ्या शिक्षणास मदत झाली असे अनेक गरीब, गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले आणि शिक्षण घेऊन खूप विद्यार्थ्यांचे भविष्य घडले.
सर भाग्यवान आहेत कारण त्यांचा वाढदिवस स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असतो, आज १५ ऑगस्ट रोजी सरांचा ७५ वा वाढदिवस सिन्नर येथील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोणीही मान्यवर नव्हते कारण सरांसाठी आलेली प्रत्येक व्यक्ती ही मान्यवर होती त्यामुळे कोणाला स्टेजवर बसवायचे आणि कोणाला खाली बसवायचे हा प्रश्नच राहिला नाही सर्वच हॉलमधील आलेले पाहुणे सरांसाठी मान्यवरच होते त्यात आमदार, खासदार, माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक, गावकरी, राजकीय, सामाजिक, पत्रकार, व्यक्ती सर्वच मान्यवर होते, त्यामुळे कार्यक्रमाला अध्यक्ष निवड देखील केली नाही, व्यासपीठावर सरांचे कुटुंब होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यगीताने म्हणजे “गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा” या गीताने सुरुवात झाली आणि या गीताने वातावरण देखील देशभक्तीमय झाले, अमृत महोत्सव आगळावेगळा बोलण्याचे कारण असे की सरांनी सामाजिक बांधिलकी जपली, जिथे आपण नतमस्तक होतो ते पुस्तक वाचण्याचे ठिकाण म्हणजे सार्वजनिक वाचनालय, सिन्नर, त्या वाचनालयास 21 हजारांची मदत दिली, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी वृक्षांना ज्या वृक्ष संवर्धक कवच लागतात अश्या २१ जाळ्यासाठी १४७०० रुपयांची मदत दिली, धार्मिक क्षेत्रासाठी 21 हजारांची मदत दिली, अनाथाश्रमात बाल संगोपनासाठी 21 हजारांची मदत दिली, खऱ्या अर्थाने करुनेचे रूपांतर कृतीत उतरवण्याचे काम सरांनी केले. वाढदिवसाच्या निमि्ताने सामाजिक कृतज्ञता जपली. या सामाजिक कार्याची सुरुवात खऱ्या अर्थाने सरांनी शालेय जीवनात असताना नैसर्गिक आपत्ती आली होती तेव्हा २१ रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठवून केली होती, तेव्हा सरांचा सत्कार गावाने केला होता.
सर्वच क्षेत्रासाठी आज सरांनी मोलाचे योगदान दिले.
एका आदर्श शिक्षकाचा वाढदिवस एक आदर्शव्रत संपन्न झाला. शिक्षक नेहमीच समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो सरांनी निवृत्तीनंतर देखील ती दिशा देण्याचे काम आज केले वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आज होते याची देही याची डोळा असा हा कार्यक्रम संपन्न झाला,
नावानेही राम असलेले आणि आचरणही रामासारखे असलेल्या सरांचा सोनांबे गावात जन्म झाला रामराव दादा पवार हे त्यांचे खरे नाव पण त्यांची ओळख निर्माण झाली ती त्यांच्या कार्याने ती म्हणजे प्राचार्य आर. डी. पवार ह्या नावाने.
सरांच्या शैक्षणिक शासकीय सेवेत सरांनी महाविद्यालयाचे वटवृक्षात रूपांतर केले, विद्यार्थ्यांना वटवृक्षासारखी सावली दिली, म्हणूनच आज सरांना आमच्या वृक्षमित्र फाउंडेशन कडून वटवृक्ष वडाचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले व वृक्षमय शुभेच्छा देण्यात आल्या.
– वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर.
(७०२०३०३७३८