‘महसूल पंधरवडा’ निमि
महसूली कायदे : लोकहितकारी व समाजवादी-सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के
महसूल पंधरवडा’ निमित्त ‘स्वातंत्र्योत्तर महसूली कायदे’ विषयावर कार्यशाळा संपन्न
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : महसूल विभागाव्दारे 1 ऑगस्टपासून राज्यात सर्वत्र ‘महसूल पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजनांचा व्यापक प्रचार-प्रसार करुन त्याचा लाभ नागरिकांना मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महसूली कायदे हे संपूर्णत: लोकहितकारी असून भारतीय राज्य घटनेतील ‘समाजवादी’ या शब्दाला केंद्रस्थानी ठेवून ते निर्माण करण्यात आले आहे, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘महसूल पंधरवडा’ निमित्त ‘स्वातंत्र्योत्तर महसूली कायदे’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. मस्के बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. मस्के म्हणाले की, भारत हा लोकशाही प्रजासत्ताक देश आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान संमत झाले असून 26 जानेवारी 1950 रोजी पासून त्याची अंमलबजावणी झाली. लोकशाही पध्दती म्हणजे लोकांच्या हिताच्या दृष्टीने केलेले कायदे होय. राज्याच्या निती निर्देशक तत्वांनुसार लोककल्याणकारी महसूली कायदे निर्माण करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने तसेच समान तत्वाने संपत्तीचे वितरण होण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर महसूली कायदे अंमलात आणले गेले आहेत, अशी माहिती त्यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना दिली.