डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावा यासाठी जन्मगावच्या लोकांचा पुढाकार
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : अमरावती शहरातील डॉ.पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भाऊसाहेबांचे जन्म गाव अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील नागरिकांनी केली आहे. त्या करिता गावातील नागरिकांनी स्वाक्षरी अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे .स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या वंशज असलेल्या वयोवृद्ध श्रीमती रजनीताई भीमराव देशमुख यांच्या स्वाक्षरीने या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात झाली .अमरावती जिल्ह्यातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ येथे निवासस्थानापासून या मोहिमेचा श्री गणेशा करण्यात आला.
शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुखांच्या कार्याचे वेगवेगळे पैलू आहेत. जसे की शिक्षण, कृषी, समाजसेवा, राजकीयही आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे विदर्भामध्ये बहुजन समाजा साठी शिक्षणाची मुहूर्त मेढ रचली .त्याचबरोबर ते भारतीय शेतकऱ्यांचे अग्रदूत ठरले. ते किसान क्रांतीचे ही जनक आहेत. अस्पृश्यता निवारना साठी पूराण मतवादाला मुठ माती देण्यात त्यांनी कमालीची उंची गाठली. वैयक्तिक चरित्र चा संदर्भात आंतरजातीय विवाह करणारे ते समाज क्रांती कारक वाटतात .तसेच वैदिक धर्मावर प्रबंध सादर करून ते ऑक्सफर्ड विदयापीठांची डॉक्टरेट मिळविणारे संस्कृतचे प्रगाढ पंडित होते आणि निष्णात वकील म्हणूनही ते सर्वांच्या आठवणीत आहेत. त्यांनी “कर्ज लवाद कायदा” हा शेतकऱ्याना कर्ज विमुक्तिचा देशातील पहिला प्रयोग होता.
स्वतंत्र भारताचे पहिले कृषमंत्री असतांना त्यांनी लाखों शेतकऱ्यांकरिता संघटना अखिल भारतीय मधुमक्षिका पालन संघटना तसेच १९५३-५४ पर्यंत भारतात धान्याचे सरासरी उत्पन्न ७०० पौंड होते.१९५४-५५ मध्ये ते ७ दशलक्ष टन इतके उत्पादित झाले .हे भाऊसाहेबक्या कृषी नियोजनाचे फलित होय. याचं बरोबर त्यांनी अनेक कृषी संघटना स्थापित केल्या. भारत कृषक समाजाची स्थापना हे त्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य होय.
या कार्यामुळे डॉ.पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी देशात एक आदर्श निर्माण केला आहे. म्हणून त्यांचा जन्म गाव “पापळ” येथील नागरिकांनी त्यांना “भारतरत्न” हा पुरस्कार देण्यात यावा या करिता स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले .तरी पुरस्कार देणारी संस्था/संघटना कडून या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. या स्वाक्षरी मोहिमेला पंचक्रोशीतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे .अनेक नागरिकांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ येथील निवासस्थानी येऊन स्वाक्षरी मोहिमेत आपला सहभाग नोंदविला आहे. या कामी संपूर्ण पापळ व आजूबाजूच्या गावात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव भारतरत्नसाठी चर्चिले जात आहे याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.