लाभार्थ्यांच्या अनुदान खात्यावर होल्ड लावणाऱ्या बँकेवर होणार कारवाई-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : शासनाव्दारे विविध कल्याणकारी योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान रक्कम जमा केली जातात. शासनाव्दारे दिल्या जाणाऱ्या अनुदानावर बँका होल्ड लावीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. शासनाव्दारे प्राप्त अनुदान खात्यावर होल्ड न लावण्याचे शासनाने व रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट निर्देश आहे. या निर्देशाचे पालन न करणारे तसेच लाभार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या बँक शाखा व्यवस्थापकावर कडक कारवाई केल्या जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित बँकाना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे जिल्हयातील विविध बँकेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अग्रीम बँकेचे व्यवस्थापक श्यामकुमार शर्मा, विभागीय उपक्षेत्रीय प्रमुख सुनील दोहरे, झोनल व्यवस्थापक उमेशकुमार पराते तसेच विविध बँकेचे नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.