मला विठ्ठल भेटला
आली आषाढी कार्तिकी
संत निघाले वारीला
भक्त भक्ती मांदियाळी
मला विठ्ठल भेटला !!
पंढरीच्या वाटेवर
मळा भक्तीचा फुलला
कांदा, भाजी फुला मंदी
मला विठ्ठल भेटला !!
वैभवात न भुलला
ना दारिद्र्यात हारला
अमीरात, गरिबात
मला विठ्ठल भेटला !!
सानं थोरं जात पात
नसे विटाळ कुणाला
सहष्णू वैष्णवात
मला विठ्ठल भेटला !!
हरि चेपतो रे पाय
ओझे वाहे संगतीला
चराचरात वारीत
मला विठ्ठल भेटला !!
धन्वंतरीच्या रूपात
वारी संगे तो धावला
पायताण शिवताना
मला विठ्ठल भेटला !!
अन्नदाता होऊनिया
कुणी धावतो सेवेला
वर्दीधारी रक्षकात
मला विठ्ठल भेटला !!
वारकरी सेवेकरी
सर्व विठ्ठल भरला
माऊलीच्या भजनात
मला विठ्ठल भेटला !!
पंढरीच्या वाटेवर
मज विठ्ठल गावला
सर्व भूतांदेही देव
मला विठ्ठल भेटला !!
–वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि )
अकोला 9923488556