‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी‘ उपक्रमातून 11 दिवसांत 5 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा
Contents
hide
गौरव प्रकाशन मुंबई, (प्रतिनिधी) : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी‘ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या ११ दिवसांत ५ लाख १२ हजार ५५३ वारकऱ्यांवर विनामूल्य उपचार करण्यात आले आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.