...आणि पारनेर चा खासदार झाला
खर तर राजकीय दृष्टीने इतिहासात डोकवल तर स्वातंत्र्य प्राप्ति नंतर राज्य पातळीवर दखल घ्यावं अस नेतृत्व पारनेर मध्ये निर्माण झालं नव्हतं. (विजय राव औटी असले तरी ही ते इतके लोकप्रिय नव्हते)लोकप्रियता आणि काम ह्या दोन्हीच्या बळावर आमदार असताना लंके साहेब यांनी आपली वेगळी छाप निर्माण करून राज्याच्या राजकारणात ग्रामीण तरुण आश्वासक चेहरा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली…..
सत्तेची समीकरण बदलली तस लकें यांनी अजित पवार गटात प्रवेश करून निधी व्यवस्थित आणल्या नंतर, खरी गुगली टाकली.ती म्हणजे अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी हे नाटक नगरकर जनतेसाठी दाखवून हळू हळू लोकसभेला आपण नव्हे ,तर राणिताई उभ्या राहणार ही जाणीव जनतेत करून दिली.विखे यांना पर्याय नाही. हा भ्रम हळू हळू फुटू लागला नाराज विखे कार्यकर्ते संपुर्ण मतदारसंघात जोडण्याच काम सुरू झालं.अखेर पवार साहेबांच्या गटात प्रवेश करून उमेदवारी निश्चित झाली. तिथे मात्र विखे यांच्या पायाखाली वाळू सरकू लागली.आणि इथून विखे चुकत गेले आणि हुकत ही गेले.
आमदारकीचा राजीनामा देत प्रचंड मोठी सहानुभूती निर्माण करण्यात लकें यशस्वी झाले.अर्ज भरताना ही राहुल गांधी येणार ? ही अफवा पसरवून विखे यांना अर्ज भरायला मुख्यमंत्री” उपमुख्यमंत्री आणायला भाग पाडून : प्रचंड गर्दी मूळे नगरकर हैराण झाले.इथेच मोठी खेळी खेळून अगदी साधेपणाने अर्ज भरत ही लढाई गरीब आणि श्रीमंत ह्यांच्यातील आहे.अस ते दाखवण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे साधेपणाच्या सहानुभूतीत प्रचंड भर पडली. मोदी जरी आले तरी ते लकें यांच्या फायद्याच ठरलं. शेतकरी पिकाला भाव नसल्या मूळे मोदी विरोधात होतेच तो रोष आणखी वाढला.
शिवाय मला पराभूत करण्या साठी जर पंतप्रधान येत असतील तर तो माझ्या साठी विजय आहे अस म्हणून त्यांनी विखे यांची खिल्ली उडवली. इथून विखे आणखी भरकटत गेले आणि पारनेर मध्ये ग्राउंड लेव्हल वर जनाधार नसलेल्या मंडळींच्या नादी लागून पायावर पद्धतशीर कुर्हाड मारून घेतली.कारण हे सदा स्वतः पडणारे नेते पारनेर मध्ये विखे यांना लीड देणार ही बाब पारनेर कर म्हणून हसू आणून सोडत होती.
आजवर न आलेली खासदार की ची संधी पारनेर ला येत असल्या मुळे किती हीविखे यांनी प्रयत्न केला पण पारनेर मध्ये ते आघाडी घेऊ शकले नाही.त्याच बरोबर श्रीगोंदा आणि पारनेर मधील नात्या गोत्याचा फायदा लकें यांना खूप झाला. कर्जत जामखेड मधून ही रोहित पवार आणि आतून शिंदे यांनी लकें यांना मोठं मतदान घडून आणलं.आणि अशा पद्धतीने पारनेरच खासदार की च स्वप्न पूर्ण झालं.!
– अशोक पवार
टीप -नगर शेवगाव पाथर्डी राहुरी मध्ये विखे यांना जास्त लीड न मिळाल्याने ते लकें यांना रोखू शकले नाही.