शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता येवला जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय तिसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
गौरव प्रकाशन
(तालुका प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय तिसरा साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा मंगळवार दि. ४ जून २०२४ रोजी संपन्न झाल . पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते. या सोहळ्यासाठी राज्यभरातील साहित्यिक उपस्थित असल्याचे अध्यक्ष मा संजय वाघ यांनी कळविले आहे.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांचे वतीने शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृती दिनानिमित राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते..
सोहळ्याच्या सुरुवातीला श्रीरामपूर येथील बालशाहीर ओवी काळे या सहा वर्षाच्या मुलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने करण्यात आली तर स्वागतगीत मा आहिरे यांनी सादर केले त्यानंतर सेवा निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथील पाठ्यपुस्तकातील कवी शशिकांत शिंदे यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर महात्मा गांधी विद्यामंदिरचे कला आणि वाणिज्य महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे सर यांच्या हस्ते फीत कापून साहित्य कलाकृतींवर पुष्पवर्षाव करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्य भरत बिडवे, प्रा. रविंद्र मालुंजकर, पुणे येथील येरवडा कारागृहाचे पीएसआय रेवणनाथ कानडे, नाशिकचे प्रोफेसर डॉ. धीरज झाल्टे, मुंबईच्या लेखिका मा. पल्लवी परुळेकर-बनसोडे, नांदगावच्या कवयित्री प्रतिभा खैरनार, नागपूरच्या प्रा.डॉ. निवेदिता राऊत, गौरव प्रकाशन अमरावतीचे संपादक बंडूकुमार धवणे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, राम गायकवाड आणि वाघ परिवार यांच्या हस्ते साहित्य कलाकृतींवर पुष्पवर्षाव करण्यात आला. साहित्य पुरस्कार प्रसंगी कलाकृतींवर असा पुष्पवृष्टी वर्षाव करून कलाकृतींचा सन्मान करणे हा महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग प्रथमच झाल्याचे मत सर्वच प्रमुख अतिथींनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथींचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला , प्रमुख अतिथींचे मनोगत झाल्यानंतर प्रतिष्ठानने राज्यभरातील साहित्यिकांकडून मागविलेल्या साहित्य कलाकृती कथा संग्रह, कवितासंग्रह, कादंबरी आणि ललित लेखन अशा विविध प्रकारच्या राज्यभरातून जवळपास ८० प्रवेशिकामधून काव्यसंग्रहाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार गंगापूर येथील कवी संतोष आळंजकर, यांच्या “हंबरवाटा” या कलाकृतीला , तर कथासंग्रहाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मा हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी, सोलापूर यांच्या “ओवाळणी” या कलाकृतीला तसेच कादंबरीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुणे येथील लेखक मा देवा झिंजाड यांच्या “एक भाकर तीन चुली या कलाकृतीला तर चिंचवड, पुणे येथील लेखक राजेंद्र घावटे यांच्या “चैतन्याचा जागर” या कलाकृतीसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मा. अध्यक्ष , उद्घाटक आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी कलाकृतींचे परीक्षक मा.प्रा. अमोल चिने – कोपरगाव, मा नाट्यकलावंत राम गायकवाड-कोपरगाव, प्राचार्य संदीप कांबळे- अहमदनगर मा राजेंद्र फंड- राहता यांच्या वतीने शर्मिला गोसावी यांचाही कार्यक्रमाचे अध्यक्ष , उद्घाटक व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
तसेच काव्यलेखन स्पर्धेत प्रथम, व्दितीय तृतीय , उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालेले कवी माणिक सोनवणे, कवी दिनेश कांबळे, कवी किरण वेताळ, कवी बालाजी नाईकवाडी व परीक्षक प्रा. मंगल सांगळे यांचाही सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला. तसेच येवला तालुक्यातील यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेली कु. प्रियंका सुरेश मोहिते हीचा प्रतिष्ठानच्या वतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून विशेष सन्मान करण्यात आला
या सोहळ्यात भायंदर ठाणे येथील कवयित्री सौ सरोज गाजरे यांच्या अखंडीत काव्यांजली या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
दुस-या सत्रात उपस्थित कवीचे कवी संमेलन घेण्यात आले याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मा सुभाष सोनवणे, नाट्यकलावंत राम गायकवाड, शर्मिला गोसावी आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित सर्व कवींचा आणि साहित्यिकांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले.
हा सोहळा साई सृष्टी लॉंन्स, तीनचारी कोपरगाव या ठिकाणी संपन्न दि. ४ जून २०२४ रोजी संपन्न झाला या सोहळ्यासाठी मा. प्रभाकर सूर्यवंशी, शर्मिला गोसावी, मा. वंदना इनानी, मा. अरविंद शेलार, मा.सुनील सूर्यवंशी, मा.अशोक नारळकर, मा. आशिष खर्चे, मा. दादाजी आहिरे, मा.रविंद्र धस, रतन पिंगट, सचिन साताळकर, श्रीनिवास सावंत, मा. भारती सावंत, मा. संदीपान निर्मळ, मा. सुवर्णा पवार, मा श्रावणी टेकाडे, साईनाथ रहाटकर,कल्पना म्हापुसकर, संजय धनगव्हाळ, सौ. सरोज गाजरे, ए.,के.मोगल, विकास खराटे,रमेश चव्हाण, सुवर्णलता गायकवाड, मा. चाबुकस्वार, मा. उमेश गोरे, समृद्धी सुर्वे, प्रबोधिनी पठाडे, राजेश्वर पारखे, संजय काळण, दत्ता देशमुख, गायक आहिरे, करण गाढवे, रोहिणी मोरे, जालिंदर डावरे, रंगनाथ भोरकडे, भागवत भोरकडे, दिगंबर केदार, मा. विजयकुमार कस्तुरे, मा. खरात, प्रांजली वीरकर, सौ. संध्या केळकर, शोभा निकम, मा. ज्ञानेश्वर देवरे, मा. सुनील बनकर, अशोक अहिरे, मिलिंद धिवर, आप्पासाहेब वाकचौरे, दीपक कानकुब्जी, गणेश भोरकडे, देवराम खोकले, समाधान जमधाडे, रविंद्र वाघ, राम आहिरे, सुनील वाघ, सुयश वाघमारे, पांडुरंग दिघे, वसंत वाघ, ज्ञानेश्वर पगारे, राहुल खंडीझोड, स्वाती खंडीझोड, दत्तू भोरकडे, बन्सी त्रिभुवन, सुभाष आहेर, कार्तिक जाधव, शिवनाथ खोकले, मीननाथ बोरजे, किशोर अढांगळे, ज्योती अढांगळे, रेशम ढांगळे, भगीरथ वाघ, प्रकाश वाघ, योगेश भोरकडे, मयूर सोनवणे, आण्णाभाऊ खोकले, वृक्षमित्र विष्णू वाघ, सौ. इंदुताई सोनवणे, हेमचंद्र भवर, संजय दंडवते, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे स.सा.का. पतपेढी कोपरगावचे कर्मचारी तसेच येवला, कोपरगाव, श्रीरामपूर, पुणे, इचलकरंजी, ठाणे, वसई, छ, संभाजीनगर, मनमाड, मालेगाव, धुळे, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, सोलापूर, लातूर, गंगापूर, चिखली, बुलढाणा, नाशिक, येथून साहित्यप्रेमी तसेच पिंपळगाव जलाल पंचक्रोशीतील ग्रामस्त व महाराष्ट्रातून आलेले कवी, साहित्यिक आदी या सोहळ्याला आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ, संपादक मा प्रशांत वाघ, सचिव मा राजेश वाघ यांनी कळविले आहे.