निलेश लकें खासदार,माता वैष्णोदेवी चरणी गटेवाडीकर तरुणांच्या साकड्याचा स्वीकार
Contents hide
गौरव प्रकाशन
नगर: निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तुतारी ह्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताच.लंके
यांना मानणारे व,त्यांचे कार्यकर्ते तरुण. गटेवाडी येथून थेट वैष्णवदेवी चरणी नतमस्तक होऊन निलेश लंके यांचं श्रध्दा स्थान असणाऱ्या वैष्णव देवी चरणी निलेशजी लंके खासदार व्हावे त्यांचा प्रचंड मोठा विजय व्हावा, ह्या साठी साकडे घालण्या साठी गटेवाडी गावातील तरूण थेट वैष्णव देवी चरणी नतमस्तक झाले होते.माते चरणी लंके विजयी होऊन खासदार व्हावे व पारनेर तालुक्यात आजवर न मिळालेलं खासदार पद पारनेरकर जनतेच्या वाट्याला त्यावं ह्या साठी त्यांनी माते चरणी साकडं घातलं होत.
आज निलेशजी लंके यांचा प्रचंड मोठा विजय झाला असुन राज्याच्या राजकारणातील मातब्बर अश्या विद्यमान खासदार सुजय विखे यांचा त्यांनीं दणदणीत पराभव केला आहे. जवळ जवळ एक लाखाच्या आसपास च्या मतांनी त्यांनी सुजय विखे यांना चितपट केले आहे.विखे यांना चितपट करून राज्याच्या राजकारणात जायंट किलर ठरलेले लकें यांच्या मूळे पारनेर तालुक्यात घरा घरात जणू दिवाळी साजरी होतेय इतका मोठा जल्लोष तालुक्यात आहे.
ह्या बाबत गटेवाडीकर तरुणांना विचारलं असता आम्ही पाहिलेलं स्वप्न मातेच्या आशीर्वादा मूळे सत्यात उतरलेअसुन.मातेच्या आशिर्वादाने आता नक्कीच नगर दक्षिण मतदारसंघाचा विकास तर होईलच परंतु सर्व सामान्य व्यक्ती खासदार झाल्यामुळे आपल्या घरातीलच खासदार असल्याची भावना सर्व सामान्य जनते मध्ये आहे,अस गटेवाडीच्या तरुणांनी ही बोलून दाखवल.निलेश लंके यांच्या राजकीय वाटचालीत गटेवाडीकर पहिल्या पासून त्यांच्या सोबत असल्या मुळे त्यांच्या विजया मूळे गटेवाडी गावात ही विशेष असा उत्साह दिसून येत आहे.