राजस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी प्राचार्य, डॉ. भाऊसाहेब गमे यांची उद्घाटकपदी निवड
गौरव प्रकाशन
येवला (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांची कार्यक्रमाचे उद्घाटकपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी अधिकृत पत्र देवून कळविले आहे.
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल , ता. येवला जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून कविता संग्रह- ४७ , कथा संग्रह-१७, कादंबरी -५ आणि ललित लेखसंग्रह- ११ अशा एकूण ८० विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एक कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे नियोजन केले असून त्याही स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण चार विविध साहित्य प्रकारातील कलाकृतींचा व काव्यलेखन स्पर्धेत निवड केलेल्या कवींचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्याक्रमचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांची निवड करण्यात आली आहे.
प्राचार्य गमेसर यांना वरिष्ठ महाविद्यालयात ३० वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे तसेच दि. २००५व पुढे ०७ जुलै २०१० पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व कला शाखेचे सदस्य होते. सध्या एम फिल व पीएचडी चे मार्गदर्शक आहेत. एम फिल व पीएचडी प्रत्येकी एक विद्यार्थ्यांला पदवी मिळाली ७ विद्यार्थी संशोधन करीत आहेत . तर झुनझुन JJTU राजस्थान येथे पीएचडी अभ्यासक्रमासाठी सह पर्यवेक्षक, सह मार्गदर्शक म्हणून दि. २८ जून २०१७ पासून ते काम पहात आहेत. त्यांची वैयक्तिक २ व संपादीत ४ संदर्भ ग्रंथ प्रकाशित आहेत.
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार प्राप्त सर्व कलाकृतींचा सन्मान दि. ४ जून २०२४ रोजी शिर्डीजवळ होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्राचार्य डॉ. गमे सर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मा. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे सरांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.