शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे पुरस्कार जाहीर
गौरव प्रकाशन येवला (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य कलाकृती पुरस्काराच्या निमित्ताने घेतलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे निकाल दि. ०१ मे २०२४ रोजी कामगार दिनाच्या दिवशी जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.
● हे वाचा – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार जाहीर
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता.येवला, जि नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने माहे डिसेंबर २०२३ मध्ये ईमेलव्दारे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या संख्येने कवींनी सहभाग नोंदवून एकूण २४२ कवींनी आपल्या कविता पाठवल्या होत्या. प्राप्त कवितांमधून अनुक्रमे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सोयगाव. जि. छ. संभाजी नगर येथील कवी माणिक सोनावणे यांच्या “धूळपेरणी” या कवितेला, व्दितीय क्रमांक सिल्लोड जि. छ. संभाजीनगर येथील दिनेश कांबळे यांच्या “रानात पेरणीला” तर तृतीय क्रमांक शिवणे, पुणे येथील किरण वेताळ यांच्या “विठूराया” तर उत्तेजनार्थ विभागून कवी संदीप राठोड, पारनेर आणि कवी बालाजी नाईकवाडी, येवला यांच्या कवितांना जाहीर झाले आहे. सर्व निवड झालेल्या कवितांचे परिक्षण प्रसिद्ध कवयित्री तथा प्राध्यापिका मा. मंगल सांगळे, सिन्नर, जि. नाशिक यांनी परीक्षण केले. परिक्षकांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले आहे.
पुरस्कार प्राप्त सर्व कवींचा सन्मान दि. ४ जून २०२४ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात होणार असल्याचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे