महाराष्ट्र माझा
Contents
hide
महाराष्ट्र देशाची शान,अवघ्या भारतात मान।।
संस्कृतीचा जपला ठेवा,लोककलेची रे समृद्धी।
प्रबोधनाची असे परंपरा अन संतांची खाण।।
सह्याद्रीने कडेकपारी, लिहिली ईतिहासाची पाने।
ताठ राहुनी सदा देतसे, लढण्याला आव्हान।।
कर्मवीर अन धर्मवीर, मातीत बहु या झाले।
वारकरी अन टाळकरी,इथे दोहोंचा सन्मान।।
उद्योगात केली क्रांती,देशात अव्वल स्थान।
श्रमाची महती येथे अन् कामगारांचा मान।।
चिरोलीपासून बांद्यापर्यंत,घेई प्रगतीचा ध्यास।
समतेचा संदेश देतसे,राज्य अमुचे महान।।
भारताचे द्वार इथे, मुंबई तयाची शान।
आषिश देई भवानी,सागर करी सलाम।।
झाले बहु होतील बहु, परंतु ह्या सम हाच।
संकटाला धावुनी जाती, इथला थोर-लहान।।
महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
आबासाहेब कडू
अमरावती
९५११८४५८३७
(१ मे महाराष्ट्र दिन)