युवा उद्योजक ज्ञानदेव शेलार यांना भारत गौरव नामांकित पुरस्कार प्रदान
गौरव प्रकाशन
मुंबई (प्रतिनिधी) : कुठलं ही काम असो ते करताना स्वतःला त्या मध्ये झोकून देऊन प्रामाणिकपणे काम केलं की यश येत आणि त्याची दखल देखील घेतली जाते हा इतिहास आणि वास्तव देखील आहे.असाच एक उमदा तरुण म्हणजे श्री क्रिएशन चे ज्ञानदेव धोंडीबा शेलार.आजच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखल जात.आणि ह्या डिजिटल युगात सन्माननीय शेलार यांनी श्री क्रिएशन डिजिटल प्रिंटिंगच्या माध्यमातून जाहिरात विश्वाला नवीन आयाम तर दिलाच त्याच बरोबर आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून अल्पावधीत असंख्य संतुष्ट ग्राहक जोडून आपल्या व्यवसायाची छाप जनमानसावर ,त्याच बरोबर उद्योग जगतावर ही पाडली आहे,
त्यांच्या ह्या गुणवत्ता ,व दर्जात्मक कामाची दखल घेऊन. नामांकित कंपनी स्विफ्ट अँन लिफ्ट ह्यांनी नामवंत कलाकार सोनाली कुलकर्णी आणि स्विफ्ट अँड लिफ्ट कंपनीचे सीईओ निलेश साबे यांच्या हस्ते भारत गौरव पुरस्कार देऊन शेलार यांनी सन्मानित करण्यातआहे. हा सोहळा रविवार दिनांक २१/०४/२०२४ रोजी ठाणे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाला आहे राष्ट्रनिर्मिती साठी तरुणांनी टाकलेले हे आश्वासक पाऊल नक्कीच गौरवास्पद आहे.श्री ज्ञानदेव धोंडिबा शेलार यांना मिळालेला हा भारतउद्योग गौरव पुरस्कार इतर तरुणांनसाठी नक्कीच दीपस्तंभ असेल असे गौरव उदगार सीईओ निलेश साबे यांनी काढले.
हा पुरस्कार मिळाल्याचं समजलं तस समाजमाध्यमावर व प्रत्यक्ष भेटून युवा उद्योजक शेलार यांचं अनेक स्तरांतून अभिनंदन केलं जातं आहे.