लंके यांची लढाई ही वर्चस्ववाद आणि घराणेशाही विरोधातील दीपस्तंभ ठरणार ?
पिठ्यांन पिठ्या सत्तेतील महत्वाची पदे आणि सत्ता केंद्र आपल्या कुटुंबा भोवती असावीत.जणू इतिहासात आपण आभ्यासलेल्या,वाचलेल्या संस्थानिकासारख. कुटुंबाबाहेर सत्ता जाऊ नये अथवा आपल्या मर्जीतील व्यक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी हवी. ह्या मानसिकतेला प्रथम सुरुंग जर कुणी लावला असेल तर तो म्हणजे निलेश लंके यांनी.
विधानसभेला पारनेर मध्ये सर्वसामान्य जनतेने ह्या वादळाला जवळ जवळ ६० हजारच्याही जास्त लीडने निवडून दिले. लंकेरुपी आलेलं हे वादळ भविष्यात नगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणार ही कल्पना अनेक राजकिय धुरंधर लोकांना होती. परंतु हे वादळ विखे ह्यांच्या साम्राज्याच्या युवराजासमोर उभे राहिल व लढा देईल अस कुणाला वाटलं नव्हतं. खुद्द विखे यांना सुद्धा ह्याची पुसटशी देखील कल्पना नसेल.
सर्व सामान्य जनतेच्या भावना आणि अस्मिता अचूक ओळखणाऱ्या नीलेश लंके यांनी अचूक वेळी आमदारकीचा राजीनामा देत. असा काही राज्याच्या राजकारणात धुरळा उठवला की तो अजून ही खाली बसायचं नाव घेत नाही. त्यामुळे सहानुभूतीची जी लाट लंके यांच्या बाजूने उभी राहिली ती पाहून. विखे यांच साम्राज्य हादरून गेलं. आणि डॉ विखे यांना पर्यायाने बाहेर पडावे लागलं. फक्त जिल्ह्यातील नेतेमंडळीत फिरून जमणार नाही हे वास्तव स्वीकारावं लागलं.
आज विखे जितके ग्राउंड लेव्हलवर येतील तितकी सहानुभूती लंके यांच्या बाजूने उभी राहणार. कारण इथून मागे कधीच न आलेला खासदार आता गावोगावी कसा फिरू लागला ? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणार. आणि निस्वार्थपणे काम करणारे लंके समर्थक ह्याच मुद्यावर रान उठवत असताना दिसत तर आहे. त्याच बरोबर विकासाच्या मुद्द्यावर ही संवाद यात्रेतून चर्चा होताना दिसत आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात जी राजकारणी आणि त्यांची मोठी घराणी ह्याबद्दल चीड आहे. त्याची कारण म्हणजे पिकाला नसलेला भाव बेरोजगारी, शेती साठी नसणार पाणी, कर्ज अश्या बऱ्याच बाबी आहेत. ज्या मूळे सर्वसामान्य माणूस धुमसत आहे.
सर्वसामान्य माणसाला आता राजकारणातील नगर पुरत बोलायचं झालं तर अँग्री यंग मॅन, निलेश लंके ह्यांच्या रुपात दिसत आहे. त्यामुळे त्यांना वाटत, हा माणूस नक्कीच शैक्षणिक सुविधा, त्या ही उच्च शिक्षणासाठी निर्माण करेन, आरोग्यासाठी काहीतरी करेल रोजगारासाठी काही तरी करेल. शेतीच्या पाण्या साठी काही तरी करेल, शेतमालाच्या भावासाठी काही तरी करेल. कारण हा आपल्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातूंन आलाय त्याला आपल्या व्यथा, आपल्या गरजा आणि समस्या नीट कळणार तर आहेच परंतु कोविड काळात त्यांनि केलेलं काम आज ही जनता विसरली नाही.
अजून म्हणजे अन्याय होतोय आणि सतत होतोय ही जाणीव सर्वसामान्य माणसाला हतबल जरी करीत असली तरी ही सर्वसामान्य घरातून आलेल्या नेतृत्वाच्या मागे आपली ताकत उभी करून निवडुण देऊन कुठ तरी होत असलेला अन्यायाचा जणू बदला घेऊ ही मानसिकता सर्वसामान्य गोर गरीब जनतेत दिसून येत आहे. हेच नेमकं नगर दक्षिण मतदारसंघात होताना दिसत आहे. विखे यांचा सहज विजय होईल अस वाटत असताना विजयाचा पारड मात्र लंके यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.!
– बंडूकुमार धवणे
अमरावती