आज प्रा. गंगा गवळी-पवार यांच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन
प्रशांत वाघ
गौरव प्रकाशन नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध लेखिका तथा एम.व्ही.पी.समाज संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मा गंगा गवळी-पवार यांच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन वैशाली प्रकाशन-पुणे यांच्याकडून प्रकाशित होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध लेखिका तथा नाशिक येथील एम. व्ही.पी.समाज संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मा. गंगा गवळी-पवार लिखित लहानपण इचतूय मी आणि धूनीवरल्या गोठी अशा दोन पुस्तकाचे प्रकाशन वैशाली प्रकाशन-पुणे यांच्याकडून प्रकाशित होणार आहे.
दि. ७ एप्रिल २०२४ रोजी ग्रंथालयभूषण मु.शं. औरंगाबादकर सभागृह, नाशिक येथे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनासाठी विधानसभा उपाध्यक्ष मा नरहरी झिरवाळ साहेब, एम.व्ही.पी. संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा..डॉ. भास्कर ढोके, एम.व्ही.पी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, साहित्यकार तथा डेप्युटी कलेक्टर मा. हिरामण झिरवळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजेंद्र मलोसे, नाटककार मा दत्ता पाटील, मराठी भाषा अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चेअध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, कवयित्री प्रा. वृषाली विनायक, प्राचार्य डॉ शिरीष लांडगे, रंगकर्मी मा. सुधीर चित्ते इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रविंद्र मालुंजकर करणार आहेत.
लहानपणीच्या आठवणी, आदिवासी गावाकडचे जीवन , लेखिकेच्या गोड आठवणी , आदिवासी कोंकणी भाषेत अशा प्रकारे लेखन केलेले वाचकांना वाचायला एक नवीन अनुभव देईल आणि मूळ बोलीभाषेतील हे लेखन मराठी साहित्याला एक जोडण्याचे काम करेल आणि एक नवा अनुभव देईल. आदिवासी साहित्याला दिशा आणि आदिवासी बोली भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी या दोन पुस्तकांचा वाचकांना नक्कीच फायदा होईल असे मत डॉ भास्कर डोके यांनी मांडले आहे.
या पुस्तक प्रकाशनासाठी साहित्यिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार, लेखिका गंगा गवळी आणि विनोद काशिनाथ पवार यांनी केले आहे.