लकें खासदार व्हावे म्हणून गटेवाडीकर तरूणांच वैष्णोदेवीला साकड
गौरव प्रकाशन
नगर (प्रतिनिधी) : नगर दक्षिणची लढत राज्यात नव्हे तर देशात होणाऱ्या हाय होल्टेज लढतीत मोजली जाणार असल्यामुळे ह्या लढतीकडे राज्याच लक्ष लागून आहे. त्यातच आपल्या नेत्यावर अपार प्रेम असणारी जनता आपला नेता निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडूण यावा ह्यासाठी आपआपल्या पध्दतीने तयारी करत असल्याचं समोर येत आहे.
पारनेर तालुक्यातील गटेवाडी ह्या गावातील तरुण “निलेश लंके खासदार व्हावे” ह्यासाठी थेट वैष्णदेवीच्या दर्शनाला गेले असून निलेश लंके हे आमदार जसे मोठ्या फरकाने झाले होते. तसेच ह्यावेळी ही ते ,मोठ्या फरकाने खासदार व्हावे” ह्या साठी मातेचरणी साकडं घातल्याच त्यांनी सांगितलं आहे. निलेश लकें यांनी आमदार असताना गावचं किती मतदान आहे, हे न पाहता कधी नव्हे इतका जवळपास (साडेतेरा कोटी रु.निधी) देऊन आमच्या गावचा विकास केला असल्यामुळे ह्या वेळी आम्ही तर ताकतीने लकें यांच्या पाठी उभे राहूच.प्रचार ही करणार असल्याच. मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या माजी उपसरपंच सुनील पवार यांनी सांगितलं आहे.
अनिल (शेठ) पवार, सतीश ठाणगे, रामदास डावखर, राहुल डावखर, सूरज गट , किरण गट, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गट मेजर, ग्रा. स.रावसाहेब गट. उपसरपंच किरण गट. प्रगतिशील शेतकरी भगवान गट ह्या सर्वांनी माते चरणी लकें खासदार व्हावे ह्यासाठी साकडं घातलं असून लंके साहेब खासदार होऊन दुष्काळ भागासाठी नक्कीच पाण्यासाठी आणि रोजगारासाठी मोठं काम उभं करतील अस मत प्रगतिशील शेतकरी भगवान गट यांनी नोंदवलं आहे.