प्रा.नंदू वानखडे यांना राष्ट्रीय चित्रकार पुरस्कार
गौरव प्रकाशन अमरावती : मुंगळा जिल्हा वाशिम येथील सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक ,समीक्षक, नाट्य लेखक, गीतकार, संगीतकार यांना नुकताच नागपूर येथील जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय चित्रकार पुरस्कार घोषित झाला आहे.
३१ मार्च २०२४ रोजी नागपूर येथे विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहामध्ये आयोजित साहित्य महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नंदू वानखडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आतापर्यंत अनेक पुरस्कारांचे धनी असलेले नंदू वानखडे यांचा साहित्य लेखनाबरोबरच साहित्य उत्कृष्ट मुखपृष्ठ व चित्र रेखाटने यामध्ये सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान आणि प्रभाव राहिला आहे. त्यांच्या अनेक कविता त्यांच्या रेखाटनसह प्रसिद्ध होत असतात. महाराष्ट्र शासनाच्या ‘शेतकरी ‘मासिकांमध्ये दर महिन्याला त्यांच्या कविता शेतकरी प्रबोधनाच्या दृष्टीने त्यांच्या चित्राच्या रेखाटनसह प्रकाशित होत असतात. तसेच कोल्हापूर येथील ‘शेती प्रगती’ या मासिकांमधून सुद्धा त्यांचे अनेक लेख, कविता, कृषी- साहित्य त्यांच्या रेखाटनसह प्रकाशित झाले आहे. आतापर्यंत अनेक कथा, कादंबरी, कवितासंग्रहाला आणि नवीन प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांना, ग्रंथांना ‘नंदू वानखडे ,यांनी समर्पक अशी मुखपृष्ठ व रेखाटने आपल्या कुंचल्यातून रेखाटली आहेत.
नंदू वानखडे हे स्वतः कवी साहित्यिक, नाटककार, असून उत्तम चित्रकार सुद्धा आहेत याची दखल घेत नागपूर, येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
नंदू वानखडे ‘यांची स्वतः लिखित सहा पुस्तके आहेत, दोन मराठी गीतांची अल्बम आहेत. नामवंत गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत. ते अनेक कार्यक्रमाचं अतिशय बहारदार ‘सूत्रसंचालन’ करतात. त्यांच्या ‘विद्रोही कवितांचा ‘एक वेगळा चाहता वर्ग आहे. मुंगळ्याच्या तळ्याकाठी, तळ हातावर सूर्य घेऊन, हेच तर सारे ९९ बाद, अंतर्मनातली आंदोलने, ज्याला नाही माय ही कथा कवितांसंग्रहाची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यांना प्रदान करण्यात येत असलेल्या ‘चित्रकार’ या अमूल्य योगदानाबद्दल, पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.