करजगाव शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
दारव्हा (प्रतिनिधी) : पी. एम. श्री जि. प. मराठी शाळा करजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण होते. तर मंचावर ग्रामपंचायत सदस्य कृष्णाजी राठोड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप राठोड, मुख्याध्यापक शरद घोंगे, गणेश राठोड, संतोष राठोड ,कैलास राठोड, शिक्षण तज्ञ रमेश वरघट, भीमराव राठोडसर, अवधूत बरडे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविक गोपाल राऊत यांनी केले. यावेळी रिया ठाकरे अक्षरा गावंडे पूजा बरडे या विद्यार्थिनी मराठमोळ्या पेहेरावात मंचावर उपस्थित होत्या. यावेळी विशाखा बरडे, पायल चव्हाण, जयश्री हिरवे, प्रीती चव्हाण, अक्षरा चव्हाण, अर्पिता राठोड, आनंदी चव्हाण, कन्हैया खंडारे या विद्यार्थ्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झालीत. तर अंकिता जाधव व ईश्वरी चिपडे यांनी शिवरायावरील “एकच राजा येथे जन्मला” हे गीत सादर केले याप्रसंगी रमेश वरघट भीमराव राठोडसर यांची समायोजित भाषणे झाली. तर मुख्याध्यापक शरद घोंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वरील तुकडोजी महाराज यांनी रचलेले भजन सादर केले.
शिवजयंतीचे औचित्य साधून शाळेतील 174 विद्यार्थ्यांना टिफिन बॅगचे वाटप करण्यात आले. तर रितिका राठोड च्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सोनटक्केसर यांनी तर नितेश भोयर सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.