करजगाव जि. प. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
दारव्हा (प्रतिनिधी) : 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करजगाव येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळीच गावातील मुख्य रस्त्यावरून विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध प्रभात फेरी निघाली होती. “भारत माता की जय” “प्रजासत्ताक दिन चिरायू हो” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी अंकिता जाधव, ईश्वरी चिपडे, रिया ठाकरे, समर्थ राठोड, निखिल राठोड, गोविंद जाधव या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, भारत माता, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची केलेली वेशभूषा ग्रामस्थांचे लक्ष वेधत होती.
प्रभात फेरी परत आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झाले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा करजगाव ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ. शितलताई राठोड होत्या तर उपसरपंच रामेश्वर चव्हाण, सदस्य कृष्णाजी राठोड, गजानन राठोड, सौ वंदना राठोड, सौ.भाग्यश्री गावंडे, सौ. विना ठाकरे, सौ. कविता राठोड तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ. पायल उमेश पवार, कांताबाई बरडे, सौ. नीताबाई राठोड, सौ. शालुबाई आडे, सौ. पवित्रा चव्हाण, अर्जुन चव्हाण, गणेश राठोड, गजानन राठोड, देवानंद गावंडे, तसेच करजगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सरीचंद चव्हाण, उपाध्यक्ष लक्ष्मणराव हिरवे आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक सुरेंद्र मुळे यांनी केले. यावेळी रोहन राठोड, आतिश चव्हाण, सानवी हिरवे, राणी राठोड, पल्लवी पवार, सोनाली चव्हाण, स्वराज्य चिपडे, नंदनी आडे, समृद्धी पवार , जयश्री हिरवे, दिशा राठोड, अर्पिता राठोड, या विद्यार्थ्यांची तसेच लक्ष्मणराव हिरवे, शिक्षणप्रेमी प्रा.रमेश वरघट, सरपंचा सौ. शितल राठोड यांची प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे झालीत. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व विद्यार्थी शिक्षक, प्रमुख पाहुणे व उपस्थित नागरिकांना जेवण देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने नितेश भोयर, दत्तात्रेय राऊत, गोपाल राऊत, कु. वर्षा ढवळे, कु. सुरेखा रोकडे आणि निलेश सोनटक्के यांचे मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभक्तीपर गीते, बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य, भांगडा नृत्य, शेतकरी नृत्य, लुंगी डान्स, खंडोबाची गाणी, कोळीगीते ,भीमगीते, गमतीदार उखाणे, आणि नकला यावर आधारित कार्यक्रम जवळपास साडेतीन तास चालला. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची उपस्थिती होती. त्यांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. तसेच बालकलाकारांचा उत्साह वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सोनटक्के यांनी तर नितीन भोयर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.