विचार अमर आहेत…
विचार अमर आहेत. ज्या मेंदूमधून ते निर्माण होतात त्याच्या पेक्षाही जास्त शक्ती विचारांमध्ये असते. विचार हे सजीव असतात. विचारांना जन्म देणारा मेंदू मातीत गेला तरीही विचार जिवंत राहतात. म्हणूनच विचार अमर आहेत. आज महात्मा गांधी आपल्यात नाहीत पण कोट्यवधी भारतीयांच्या हृदयामध्ये ते जिवंत आहेत कारण त्यांचे विचार !
जगात सगळीकडे हिंसा चालली असताना जगावेगळा अहिंसेचा संदेश महात्मा गांधीनी भारताला दिला, म्हणूनच आज ते आपल्यात आहेत. परदेशात झालेला हिंदू लोकांचा छळ पाहून ज्यांनी बॅरिस्टरचा झगा फेकून दिला आणि भारतात येऊन मानवतेचे वकील झाले म्हणूनच आज आपण त्यांना मानतो. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यांनी भारतातील गरिबांना अंगभर कपडा मिळत नाही म्हणून आयुष्यभर केवळ पंचा वापरला. या महान विचारांमुळेच आज गांधीजी जिवंत आहेत. ही पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत गांधीबाबांचे विचार मरू शकत नाहीत. म्हणूनच ‘विचार’ अमर आहेत, म्हणूनच गांधीजी अमर आहेत.
(पृष्ठ क्र. १७)
महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
* * *
पुस्तक – येरे येरे पैसा । सचिन वसंत पाटील
पद्मरत्न प्रकाशन । पृष्ठे: ११२, मूल्य: २०० रुपये
(सुधारित तिसरी आवृत्ती)
* सवलतीत १०० रुपये । मोबा. 8275377049