लक्ष-लक्ष दिव्यांनी न्हाऊन दिघणार गुरुकुंजातील रामकृष्ण हरी मंदीर
प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा लाभ गुरुकुंजातुन घेता येणार
गौरव प्रकाशन गुरुकुंज मोझरी (प्रतिनिधी) : अयोध्या येथे प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.त्यानिमित्त गुरुकुंज आश्रमातील दासटेकडीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण हरी मंदीरात लक्ष दिव्यांची आरास महीला समितीच्या वतीने प्रज्वलित करुन परीसर भक्तिरसाने पुलकीत होणार आहे आहे.याबाबत समितीची नियोजनात्मक बैठक संपन्न झाली .22 जानेवारी रोजी दुरस्थ प्रणाली द्वारे अयोध्या येथे प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दर्शन दुपारी 12 वाजतापासुन रामायणकथा वाचन,दिवसभर भजन गायन, व संध्याकाळी 6 वाजतापासुन लक्ष दिव्यांची आरास प्रज्वलित करुन रात्रीचा आसमंत दिव्यांनी प्रकाशमय करण्यात येणार आहे.
धर्म लयाला जातो म्हणुनी, रामकृष्ण हरि आला ।
सगळ्या जनतेशी बोला ।।
एकाचे अवतार तिघेही, एके ठायी आले ।
दास टेकडीवरती बसण्या, अति उत्सुक ते झाले ।
पंढरपुरची वारी करण्या, लांब लांब का जाता ।
इथेच येउनि सदा बसावे, वाटतसे भगवंता ।
चला चला गुरुकुंज बघाया-
असे लोकप्रिय भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहीले. तेव्हा पासुन येथे आषाढी एकादशीला दरवर्षी मोठा महोत्सव संपन्न होत असतो 160 वर्षीय स्वामी सिताराम महाराज तुकडोजी महाराजांना राम म्हणुन संबोधत असत.यासर्व आठवणींना यावेळी उजाळा मिळणार आहे.परीसरातील भाविकांनी यासोहळयाचा लाभ घेण्याचे आवाहन रामकृष्ण हरी मंदीर समितीचे विश्वस्त प्रमुख व राष्ट्रीय किर्तनकार विलासराव साबळे यांनी केले आहे.