Contents
hide
- रक्षाबंधनाच्या ।
- हार्दिक शुभेच्छा ॥
- मनस्वी सदिच्छा ।
- सर्वांनाच ॥ १ ॥
- प्रेमाचा हा सण ।
- भाऊ बहिणींचा ॥
- मधुर नात्याचा ।
- रक्षणाचा ॥ २ ॥
- भाऊ बहिणीच्या ।
- प्रेमाचा हा दिन ॥
- आनंदाचा क्षण ।
- जीवनात ॥ ३ ॥
- राखी विश्वासाची ।
- बहीण बांधते ॥
- घट्ट होई नाते ।
- तयांचेच ॥ ४ ॥
- शोभतसे राखी ।
- भाऊंच्या करात ॥
- उजळे ज्योतीत ।
- नातेद्वय ॥ ५ ॥
- भाऊंच्या हृदयी ।
- बहिणीचा मान ॥
- रक्षणाची जाण ।
- होत असे ॥ ६ ॥
- असे सोबतीला ।
- सुखात दुःखात ॥
- दुःखावर मात ।
- करितसे ॥ ७ ॥
- राखी पौर्णिमेला ।
- रेशमाचे धागे ॥
- बंधूप्रेम जागे ।
- बंधनाने ॥ ८ ॥
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर, अमरावती .
- भ्र ध्व. : ८०८७७४८६०९.