जि प शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
गौरव प्रकाशन दारव्हा (प्रतिनिधी) : जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा करजगाव येथे आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शरद घोंगे तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी प्रा. रमेश वरघट, गोपाल राऊत, नितीन भोयर, कु. वर्षा ढवळे आदी मंचावर उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व अंकिता जाधवच्या सावित्री वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शर्वरी राठोड, नंदिनी आडे, राधिका चव्हाण, दिशा राठोड, अर्पिता चव्हाण, प्रीती चव्हाण यांची सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झालीत. विशाखा बरडे आणि चांदणी राठोड यांनी सावित्रीबाई फुले वरील गीते सदर केलीत. यावेळी पूनम चव्हाण, अश्विनी पवार, शिवानी राठोड, महेक धवणे, समृद्धी पवार, जयश्री हिरवे, सोनु चव्हाण, तृप्ती राठोड, पायाल चव्हाण वैशाली चव्हाण, पल्लवी पवार, राजकुमारी चव्हाण, प्रगती राठोड, शीतल राठोड, या विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या वेशभूषा करून अभिनय सादर केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शरद घोंगे तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी प्रा. रमेश वरघट, यांची भाषणे झाली.
याप्रसंगी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रय राऊत यांनी केले. सर्व विध्यार्थाना खाऊ वाटप केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.