माय माझी सावित्री.!
3 जानेवारी बालिका दिन म्हणून आज 3 जानेवारी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रथमता सावित्रीमाईला शतशः नमन… ‘सावित्री तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला’ खरंच सावित्रीबाई जन्मल्याच नसत्या तर ?आज स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्याला दिसल्याच नसत्या… स्त्रियांना जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते मिळालंच नसतं… म्हणूनच खरी देवता विद्येची तूच सावित्री माऊली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही….. सावित्रीमाईने समाजाचा रोष पत्करून, असंख्य वेदना झेलून क्रांतीज्योती ज्योतिराव फुलेंच्या मदतीने मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि सर्वधर्मीय मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांचे कार्य मुलींच्या शिक्षणापुरतेच मर्यादित नव्हते तर त्या काळामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या उदा. कुमारी माता, सती प्रथा, विधवांचे प्रश्न अशा प्रत्येक सामाजिक प्रश्नावरती ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रत्यक्ष काम केले म्हणूनच त्या कृतीतून समाजाची सुधारणा करणाऱ्या आदर्शवत समाजसुधारिका सुध्दा ठरतात.
सावित्रीबाईंनी इतका त्रास सहन करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते? समाजाचा रोष पत्करला होता? पडेल तो त्रास सहन करून मुलींना शिक्षण देण्यासाठी धडपडत होत्या?….आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत आणि म्हणूनच ज्या सावित्रीमाईने आपल्याला स्त्रीत्वाची प्रेरणा दिली, प्रत्येक स्त्रीमधील सृजनाचा सन्मान जिच्यामुळे झाला,
जग बदलण्यास
मी होईल वारस तुझी…
तू लढलीस लढाई माझी
सावित्री तू होतीस म्हणून…
आम्हा जगण्याला तू ,
अर्थ संजीवनीचा आला …..
आलेल्या परिस्थितीतुन तू ,
मार्ग आम्हा दिला ….
मी मलाच ,
आधी ओळखले ….
मी माझ्यातील स्वाभिमान
तुझ्यामुळेच मला मिळाले …
प्रत्येक स्त्रीत्वाचा सन्मान तू
नारी नारीला दिला …
अंधश्रद्धेच्या अंधारातून तू
सूर्य प्रकाशात आणला ….
श्रीमती कल्पना महादेव झाल्टे
धुळे
9960204629