तुझ्या सारखे छप्पन पाहिले
……………………….. ……….
तुझ्या सारखे छप्पन पाहिले
हा इतिहास आमचा आहे
ऐका एकाने छप्पन कापले
हा इतिहास आमचा आहे….
आपल्याच माणसांनी
आम्हा बेदखल केले
जनावरां पेक्षा ही
बस्तर होती आमची जिंदगी
शिकार होतो आम्ही
मनु व्यवस्थेचे
दुंगणाला फडक
गळ्यात मडक
गळून पडलं रे बा भीमा ….
आता स्वाभिमानी
दरारा आहे ..
तुझ्या सारखे छप्पन पाहिले
हा इतिहास आमचा आहे …
किती पिढ्या बरबाद झाल्या
आणि फार केले अपमान सहन
एक जानेवरी 1818 ला
क्रांतीचा बिगुल वाजला
अठ्ठावीस हजार पेशव्याना
पाचसे महारानी
मातीत गाडला
असा महार शुर आहे
तुझ्या सारखे छप्पन पाहिले
हा इतिहास आमचा आहे …
विजय स्तंभावर जाऊन भीमाने
गर्जून सांगितले आम्हा
अरे वाघाची औलाद तुम्ही
मोल तुमचे जाणा …..
देऊन तथागत बुद्ध
शुद्ध आम्हा केले आहे
संघर्षाचा संदेश देऊन
वाघ आम्हा केले आहे ……
तुझ्या सारखे छप्पन पाहिले
हा इतिहास आमचा आहे …..
या देशाचा इतिहास गडे हो
बा भीमाने लिहिला आहे
शिका संघटित व्हा
अन्यायाला लाथाडा
संदेश आम्हा दिला आहे……
तुझ्या सारखे छप्पन पाहिले
हा इतिहास आमचा आहे…..
-राजेंद्र क. भटकर
बडनेरा