आमची भीमाई माऊली
बाबा तुझी लेकर
सैरभैर झाली
सापडेना वाट
कोण आमचा वाली…
तू गेल्या पाठी
वैराण जिंदगी झाली
तुझी लेकरे बाबा
वणव्यात न्हाली …..
उरला ना कोणी
दिनाचा वाली
हरविली इथ
रंजल्याची सावली ….
तू वाढली भाकर
पोटभर झाली
तुझा पडला विसर
अवघी पतझड झाली …
तू दिल अनमोल
नवजीवन साजर
सुरू इथ झाला
भलत्याचा गजर ….
तू माय साला बापा
झाला उणात सावली
अवघं म्हणते रे जग
आमची भिमाई माऊली …
-राजेंद्र क. भटकर
” राजगृह ” अलंकार पार्क नवी वस्ती बडनेरा, अमरावती.
(छाया : शशी नितनवरे)