*निवेदन*
शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा
गौरव प्रकाशन नाशिक (प्रतिनिधी) : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृती सोहळ्याच्या निमित्ताने राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून *दि. ०१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ अखेर प्रकाशित झालेल्या खालील प्रकारातील साहित्य कलाकृती मागविण्यात येत आहे
१. कविता संग्रह
२. कथा संग्रह
३. कादंबरी
४. ललित संग्रह
वरील प्रकारातील साहित्य कलाकृतीच्या दोन प्रती प्रतिष्ठानच्या पत्त्यावर पाठवाव्यात. राज्यभरातील जास्तीत जास्त साहित्यिकांनी या पुरस्कारासाठी भाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा संजय शहादू वाघ यांनी केले आहे
* पुरस्काराच्या अटी व नियम पुढील प्रमाणे.
निवेदन काळजीपूर्वक वाचावे.
१. पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
२. साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी महराष्ट्रातील साहित्यिकांनी आपली कलाकृती
मा अध्यक्ष- शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता.येवला, जि. नाशिक. पिन-४२३४०१
या पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टने दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत* पोहचतील या बेताने पाठवावी. पोस्टाची पावती आणि त्यासोबत सहभागपत्र sswpunyasmaran2023@gmail.com या ईमेलवर पाठवून नोंदणी करावी. पावतीचा फोटो ९०२११२२८८७ या व्हाटसऍप नंबरवर पाठवावा
३. पाकिटावर शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, आयोजित पुरस्कारासाठी असा उल्लेख करावा.
४. सोबत सहभाग पत्रात नमूद करावयाच्या बाबी- साहित्यिकाचे पूर्णनाव व पूर्ण पत्ता संपर्क क्रमांकासह / साहित्य कलाकृतीचे नाव / साहित्य प्रकार/ प्रकाशन वर्ष / प्रकाशक इ. मजकूर आवश्यक आहे. कलाकृतीवर कोणतेही संदेश अथवा नाव, सही करू नये.
५. वेळेच्या नंतर आलेल्या कलाकृती ग्राह्य धरल्या जाणार नाही. कलाकृती प्राप्त झाल्यावर संबंधित साहित्यिकांना कळविण्यात येईल.
६. साहित्यिकांनी दि. ०१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकाशित झालेल्या कलाकृतीची फक्त प्रथम आवृत्ती पाठवावी.
७. साहित्यिकांनी दोन प्रकारचे साहित्य अथवा दोन वेगवेगळया साहित्य कलाकृती पाठवू नयेत, कोणत्याही एकाच प्रकारच्या साहित्य कलाकृतीच्या दोन प्रती पाठवाव्या.
८. पुरस्कारासाठी आलेल्या सर्व साहित्य कलाकृती परीक्षकांना दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत परीक्षणासाठी पाठविण्यात येतील.
९. कलाकृती पुरस्कार स्पर्धेचा निकाल दि. १५ मे २०२४ पर्यंत जाहीर केला जाईल, याबाबत कोणतीही वारंवार विचारणा करू नये.
१०. पुरस्कार स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी प्रत्यक्ष हजर राहून पुरस्कार स्वीकारावा लागेल, पोस्टाने पुरस्कार पाठविला जाणार नाही याची नोंद घ्यावी. साहित्यिकांनी भाग घेतांना या सूचनेचा विचार करूनच भाग घ्यावा.
११. पुरस्कार वितरण सोहळ्यास पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना आमंत्रित केले जाईल तथापि, इतर साहित्यिकांना येणे शक्य असल्यास त्याचे स्वागत असेल त्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.
१२. पुरस्कार वितरण सोहळ्यास येणा-या कोणत्याही साहित्यिकांना प्रवास खर्च दिला जाणार नाही. स्वखर्चाने यावे लागेल. तथापि चहा नाष्टा आणि जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था केली जाईल.
१३. साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण दि. ४ जून २०२४ रोजी नियोजित स्थळी केले जाईल. कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ नियोजनाअंती कळविण्यात येईल.
पुरस्काराचे स्वरूप
* साहित्य कलाकृती क्रमांक व पुरस्कार पुढीलप्रमाणे असतील –
* काव्यसंग्रह – रु. ३००१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र*
* कथासंग्रह – रु. ३००१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
* कादंबरी – रु. ३००१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
* ललित – रु. ३००१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
१४. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
१५. शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी करत नाही याची नोंद घ्यावी.
१६. नोंदणीकृत प्रत्येक साहित्यिकाला दि. १५ मे २०२४ पर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणाबाबत आणि पुरस्काराबाबत सविस्तर कळविले जाईल.
*संपर्क आणि अधिक माहितीसाठी – अध्यक्ष , शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान – संजय वाघ- ९०२११२२८८७*