सणांचा राजा श्रावण सुरू आहे. आता पुढचे सगळे दिवस व्रतवैकल्यं आणि सणांचे आहेत. सण म्हटलं की गोड खाणं आलं. अशा गोड पदार्थांमुळे कॅव्हिटी म्हणजे दातांमध्ये खड्डे पडण्याची समस्या निर्माण होते. मात्र थोडी काळजी घेऊन ही समस्या टाळता येते.
गोड खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरली पाहिजे. यामुळे दातात अडकलेले अन्नकण निघून जातात आण बॅक्टेरियांच्या वाढीला आळा बसतो. गोड खाताना सतत पाणी पित रहा. पाणी पणं चूळ भरण्यासारखंच असतं. गोड घासासोबत पाणी प्यायल्याने दातांवर साखरेचा थर साचत नाही. सलग दोन जेवणांमध्ये गोड पदार्थ खाणं टाळा. कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करा. दूध, दही, चीज यासारख्या पदार्थांमुळे कॅव्हिटीजची समस्या कमी होऊ शकते. प्रत्येक जेवणानंतर चूळ भरा. यामुळे तोंड आतून स्वच्छ होतं आणि बॅक्टेरियांच्या वाढीला आळा घालता येतो. माउथवॉशचा वापर करता येईल. माउथवॉॅशमध्ये बॅक्टेरियाविरोधी घटक असतात. दिवसातून दोनदा दात घासा. तोंडाची स्वच्छता राखणं सर्वाधिक गरजेचं आहे. वेळच्या वेळी दातांची तपासणी करून घ्या. यामुळे दातांचं आरोग्य टिकवून ठेवता येईल.