एडतकरांना उतारवयात गजणीसारखे धक्के येतात, ते म्हणजे अमरावतीचे संजय राऊत
डॉ.बोंडे यांच्यावरील टीकेला नकुल सोनटक्के यांचे चोख प्रत्युत्तर
अमरावती (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षातील निवडकांचा अपवाद वगळता काडीचीही किंमत नसलेले ॲड.दिलीप एडतकर हे अमरावतीचे संजय राऊत असून सकाळी उठल्या-उठल्या त्यांची डराव डराव सुरू होते. यात त्यांचाही दोष नाही. उतारवयात असे गजनीसारखे तीव्र धक्के येणे साहजिकच असतात. त्यामुळे राज्यात, अमरावतीत काय सुरू आहे याचे भान त्यांना स्मृतीभंशाअभावी राहत नसल्याची जोरदार टीका भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी केली आहे. एडतकर यांनी तिवसा येथील घटनाक्रमावरून कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व डॉ.अनिल बोंडे यांच्यावर टीका केली होती. त्याला सोनटक्के यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे हे तिवसा येथे शंकरपट पाहण्याकरिता गेले होते. दरम्यान अज्ञातांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली होती. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे ढींडवळे निघाले आहेत. खासदार सुरक्षित नसतील तर सामान्य जनता काय सुरक्षित असेल असा आरोप केला होता. या आरोपाला प्रतिउत्तर देताना भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी दिलीप एडतकर यांच्यावर जोरदार शरसंधान साधले आहे. ‘ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी’ या युक्तीप्रमाणे एडतकर हे आपल्या मूळ विचारधारेपासून भरकटले आहेत. यशोमती ठाकूर यांची चाकरी करण्यात ते सध्या पराकोटीचे व्यस्त आहेत. ज्याप्रमाणे, मुंबईत संजय राऊत सकाळी उठून महायुतीमधील नेत्यांना टार्गेट करत असतात. त्याचप्रमाणे दुसरे संजय राऊत सध्या अमरावतीत तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊतांना राज्यात काडीचीही किंमत नाही. तशी गत सध्या अमरावतीत दिलीप एडतकर यांची काँग्रेस पक्षात झालेली आहे. एडतकर यांचा जन्म ४ डिसेंबर १९५८ चा. मुळचे ते यवतमाळ जिल्ह्यातील. अमरावतीत ते स्थिरावले.
त्याप्रमाणे, ६४ वर्ष ११ महीने २५ दिवसाचे. महिने, अठवडा, दिवस, तास, मिनिट, सेकंदात त्याचे वर्गीकरण करायचे असल्यास अनुक्रमे ७७९, ३३९०, २३७३६, ५६९६६४, ३४१७९८४०, २०५०७९०४०० असे त्याचे उत्तर येईल. मध्यंतरी ऐकल्याप्रमाणे अधून-मधून त्यांची प्रकृती ही अत्यावस्त होत असते. त्यामुळे, महायुतीच्याविरुद्ध त्यांना अधून-मधून गजनीसारखे तीव्र धक्के येत असतात. हे धक्के आल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्याविरुद्ध ते गरळ ओकत असतात. ती ओकताना आपण काय बोलतो आहे? राज्यातील सध्या स्थिती काय आहे? महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस नेत्यांनी किती पाप केले, याचे भान त्यांना स्मृतीभंशाअभावी राहत नाही. संजय राऊत यांना ज्याप्रमाणे कोणीही गांभीर्याने घेत नाही तसेच यांनाही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. अशी टीका करत नकुल सोनटक्के यांनी दिलीप एडतकर यांनी विनाविलंब नामांकित वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा व आपली प्रकृती ठणठणीत करावी, असे देखिल प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीचे प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश इंगळे-पाटील कळविले आहे.