पारनेर मधील गारपीट फक्त शेतकरी नव्हे तर अनेक ग्रामीण व्यवसायाच कंबरडं मोडणार.!
आज जरी आपण अवकाळी पाऊस आणि गारपीट ही केवळ शेतकरी वर्गाला फटका देऊन जाणार, हा विचार करत असलो तर ते काही अंशी सत्य आहे. परंतु शेतकरी वर्गाबरोबर ग्रामीण मजूर, त्यानंतर, छोटे-मोठे वाहतूक व्यावसायिक. त्यानंतर आजूबाजूला असणारी बाजारपेठ. तिच्यावरही परिणाम होणार.अजून पुढे म्हणजे आडतदार, तिथे काम करणारा हमाल, बाजारातील माल उचलणारे वाहतूक व्यावसायिक या सर्वांच्यावर ह्याचा गंभीर परिणाम होणार आहे.
कारण वरील सर्वांची आर्थिक गणित ही शेतकरी वर्गाशी खूप निगडित आहे. गारपीटीमुळे शेतमाल बाजारात गेला नाही तर शेतकरी वर्गाकडे पैसा हा खूप कमी प्रमाणात आल्यामुळे आर्थिक बाबतीत शेतकरी आपोआप हात आखडता घेतो. त्याचा परिणाम मात्र गाव ते बाजारपेठ सगळीकडे पहायला मिळतो. त्यामुळे जास्त नुकसान शेतकरी वर्गाच झालं जरी असले तरी त्याच्या झळा मात्र अनेक जणांना बसणार ह्यात वादच नाही.
● हे वाचा– पारनेर मध्ये ही मराठा आंदोलन पेटलं ; गटेवाडीचे उपसरपंच सुनीलशेठ पवार यांचा राजीनामा
दुसर म्हणजे शेतकरी वर्गाला जर नीट आर्थिक मदत मिळाली नाही तर तो नाराज होणार. आणी ही नाराजगी सत्ताधारी पक्षावर निघत असते. हे सत्य नाकारता येत नाही. ठरल्या प्रमाणे विरोधी पक्ष आपण कसे शेतकरी हितकारक आहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार. राजकारणात शेवटी संधी महत्वाची असते मग ती कशी ही असो. नितीमत्तेला हरताळ फासलेल्या राजकानात जर संधी साधता आली नाही तर तो राजकारणी कसला?
सांगायचा मुद्दा असा की नैसर्गिक हानी जिथंही होते ती फक्त ठराविक घटक नव्हे तर सर्वांना अडचणीत आणते. आपण फक्त ज्या वर्गाला त्याचा जास्त फटका बसतो तोच ढोबळ विचार करतो. पण परिणाम सर्व घटकावर होत असतात.
अशोक पवार
8369117148