बा विठ्ठला…
Contents
hide
नाही आलो भेटिलागि
नको रुसु बा विठ्ठला
तुझ्या नावाचा गजर
माझे हृदयी मांडला !!
आज सण एकादशी
मी उपवास ठेविला
अहंकार माया मोह
तुज प्रसाद वाहिला !!
काम,क्रोध,द्वेष,लोभ
तुझ्या चरणी वाहिले
चरणी तुझिया आज
मी परब्रह्म पाहिले !!
अगा पंढरीच्या राणा
माझे विठ्ठल सखया
कृपाळू तू दयाघना
तुची दाखवी रे दया !!
सुखी ठेव अन्नदाता
माझे ब्रम्हांडनायका
चराचरी सौख्य नांदो
दे सु्बुद्धी सर्व बालका !!
संपू दे रे ईडा पीडा
काळ येऊ दे सुखाचा
तुच जगाची माऊली
नाश करावा दुःखाचा !!
विनवितो वासुदेव
जोडुनिया दोन्ही कर
तुझे नाव मुखी, कर्णी
हरिनामाचा गजर !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556