आत्महत्याग्रस्त देव्हारे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या
*भाजपचे नकुल सोनटक्के यांची मागणी
* तहसीलदारांना दिले पत्र
गौरव प्रकाशन
दर्यापूर : अतिशय हलाखीची परिस्थिती असलेले व कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या अरुण रामभाऊ देव्हारे यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी तहसीलदार रवींद्र कानडजे यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील येवदा येथील अरुण रामभाऊ देव्हारे यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येवदा येथे सोमवारी उघड़कीस आली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या सूचनेप्रमाणे देव्हारे यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भाजप सक्षमपणे उभी असल्याचे त्यांनी शोक संवेदना व्यक्त करताना म्हटले.
शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलेले सरकार आपल्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, तहसीलदार रवींद्र कानडजे यांच्याकडे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणीही नकुल सोनटक्के त्यांनी पत्रदेत केली.