सामाजिक न्याय विभागातंर्गत निवासी शाळांच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न
गौरव प्रकाशन अमरावती,(प्रतिनिधी) : निवासी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा इत्यादी गुणांची वाढ व्हावी, यासाठी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळांच्या फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालयाचे फुटबॉल मैदानावर नुकतीच संपन्न झाली.
या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर तसेच पंच श्री. सोलीव व श्री. म्हाला आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव यांनी संबोधित करताना विद्यार्थ्यांनी किमान एका तरी खेळात प्राविण्य मिळवावे. व त्या माध्यामातून आपले करीअर घडवावे. या फुटबॉल स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, तुळजापूर ता. चांदुर रेल्वे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, सामदा ता. दर्यापूर, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय शाळा, बेनोडा ता. वरूड, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, नांदगाव खंडेश्वर अशा एकूण 4 निवासी शाळांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.